जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरात बुलेटची चॊरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण तीन कि. मी.अंतरावर असलेल्या साई सिटी या उपनगरात रहिवासी असलेले इसम प्रदीप गंगाधर महानोर (वय-३३) यांनी आपल्या साई रेसिडेन्सी या ठिकाणी उभी करून ठेवलेली ७० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची इनफिल्ड बुलेट हि दुचाकी दि.०१ ऑक्टोबरच्या सायंकाळी ०६ वाजे नंतर ते पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याचा गुन्हा त्यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव शहरात दुचाकीस्वारात खळबळ उडाली आहे.

अलीकडील काळात शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.चोरट्यांनी आपली हाथ की सफाई दाखवून कोपरगाव शहर पोलिसांना वाकुल्या दाखविण्यास सुरुवात केली आहे.अशीच घटना कोपरगाव शहरातील उत्तरेस साधारण तीन कि. मी.अंतरावर असलेल्या व फिर्यादी रहात असललेल्या साईसीटी या उपनगरात घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,अलीकडील काळात शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.चोरट्यांनी आपली हाथ की सफाई दाखवून कोपरगाव शहर पोलिसांना वाकुल्या दाखविण्यास सुरुवात केली आहे.अशीच घटना कोपरगाव शहरातील उत्तरेस साधारण तीन कि. मी.अंतरावर असलेल्या व फिर्यादी रहात असललेल्या साईसीटी या उपनगरात घडली आहे. त्या ठिकाणच्या साई रेसिडेन्सी या इमारतीत त्यांनी खाली गाडी उभी करण्याच्या ठिकाणी आपली ७० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची इनफिल्ड बुलेट (क्रं.एम.एच.१२ एन.वाय.६००७) हि उभी करून ठेवली असता व ते आपल्या घरी गेले व दुसऱ्या दिवशी सकाळी ते ती गाडी घेऊन बाहेर जाण्याच्या बेतात असताना त्यांना आपली गाडी लावलेल्या ठिकाणी दिसली नाही. त्यांनी इतरत्र शोध घेला असता ती मिळून आलेली नाही.अखेर कंटाळून त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याने आपल्या संमतीशिवाय लबाडीच्या ईराद्याने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३०३/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close