आरोग्य
कोपरगावातील बालकांना उद्या देण्यात येणार..हा डोस

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उद्या दि. ३१ जानेवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील पाच वर्षांपर्यंतच्या लहान वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहेत. नजिकच्या प्रा.आ.केंद्र,आरोग्य उपकेंद्र,अंगणवाडी येथे पोलिओ बुथवर सदर डोस सकाळी ८ ते ५ या वेळेत पाजणेत येणार आहेत याची नागरिकांनी दखल घ्यावी असे आवाहन कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
पोलियो अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे.पोलियोच्या उपसर्गाच्या ९० टक्के घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत परंतु विषाणूनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १ टक्क्या पेक्षा कमी रुग्णांच्याबाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या ‘गतिप्रेरक न्यूरॉनना’ अपाय करतो म्हणून याची लस प्रत्येक बालकास घेणे गरजेचे आहे.
पोलियो अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे.पोलियोच्या उपसर्गाच्या ९० टक्के घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत परंतु विषाणूनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १ टक्क्या पेक्षा कमी रुग्णांच्याबाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या ‘गतिप्रेरक न्यूरॉनना’ अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते.याला यूरोपीय देशात २००२ मध्ये याचे निर्मूलन केले गेले तर भारतात सरकारने १९९५ साली सुरू करण्यात आलेल्या पल्स पोलियो योजने मुळे भारत देश पूर्णपणे पोलियोमुक्त होऊ शकला असून भारतात २०१४ मध्ये निर्मूलन करण्यात आले आहे.मात्र आगामी काळात याचे उच्चाटन होण्यासाठी लस देणे गरजेचे आहे.त्यामुळे शासन हा उपक्रम राबवत असते.
कोपरगाव तालुक्यात ६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे मार्फत ० ते ५ वर्ष वयोगटातील ३२०१७ बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत.२८१ पोलिओ बुथवर ५७९ कर्मचार्यांमार्फत हे डोस देण्यात येणार आहेत.यामध्ये आशा,अंगणवाडी सेविका,ए.एन.एम.एम.पी. डब्ल्यू,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहाय्यिका,वैद्यकीय अधिकारी यांचा सहभाग असणार आहे.
सर्व जनतेने आपल्या घरातील,व आलेल्या पाहुण्यांची, शेजारील,नविन जन्म झालेल्या वय ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना नजिकच्या पोलिओ बुथवर पोलिओ डोस पाजणे गरजेचे आहे.याची सर्व ग्रामस्थांनी दखल घ्यावी असे आवाहन कोपरगाव तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.या डोस मुले आपल्या बाळाला अपंगत्वापासुन वाचवणे शक्य होणार आहे.असेही त्यांनी शेवटी म्हटलें आहे.