जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

‘ती’आत्महत्या नव्हे तर खून,शहरात उलटसुलट चर्चेला उधाण !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या सुभाषनगर येथील रहिवासी असलेला तरुण ऋषिकेश लक्ष्मण त्रिभुवन (वय-१८) याचा मृतदेह दि.१३ मार्च रोजी गोदावरी नदीचे छोट्या पुलाजवळ असलेल्या नदीपात्रातील पाण्यात आढळून आला असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी हा मृत्यू हा खून असल्याची विश्वसनींय माहिती हाती आली आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरातील मयत तरुण ऋषिकेश त्रिभुवन याचे छायाचित्र.

मयत तरुणाच्या डोक्यास जखम होती व तो पाण्यात पडण्यापूर्वी जिवंत होता अशी माहिती हाती आली आहे.व विशेष म्हणजे तो पाण्यात पडल्यावर किंवा आत्महत्या केली असल्यास फुगणे क्रमप्राप्त होते मात्र ते फुगलेले नव्हते हे विशेष ! म्हणजेच त्यास आधी मारहाण करून त्याची आत्महत्या दाखविण्यासाठी त्यास गोदावरीत टाकून संशयित आरोपीनी सदर गुन्ह्यावर पांघरून घालण्याचा सोयीस्कर प्रयत्न केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती हाती आली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत तरुण हा आपले वडील लक्ष्मण त्रिभुवन यांना मी,”रोडवर फिरून येतो” असे सांगून घराबाहेर गेला होता.मात्र तो उशीर होऊनही परत आला नाही.त्याचा नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचेकडे शोध घेऊनही तो मिळून आला नव्हता.त्यामुळे घरच्या नातेवाईकांनी याबाबत कोपरगाव शहर पोलिसांना खबर दिली होती.मात्र उशिराने त्याचा मृतदेह दि.१३ मार्च रोजी दुपारी १.३० वाजे पूर्वी गोदावरी नदीचे छोटे पुलाजवळ आढळून आला होता.त्याबाबत त्याचे वडील लक्षण त्रिभुवन यांनी कोपरगाव शहर पोलिसांना या प्रकरणी खबर दिली होती.घटनास्थळी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट दिली होती.व त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्या उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.१७/२०२३ सी.आर.पी.सी.कलम-१७४ अन्वये नुकतीच नोंद दाखल केली होती.

दरम्यान मयत तरुणांचा वैद्यकीय अहवाल अद्याप अप्राप्त आहे.त्याच्या तपासणीसाठी त्याचा काही शारीरिक अंश हा नाशिक येथील वैद्यकीय प्रयोग शाळेत धाडण्यात आलेला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.तो मिळण्यास किमान एक महिना लागणार असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान या तरुणांच्या मृत्यूबाबत शहरात विविध उलटसुलट चर्चा सुरु असून तो मृत्यु हा पाण्यात बुडून नसून त्याचा संबंध हा शहरातील मोठ्या रेशन घोटाळ्यातील आरोपींशी असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.मात्र सदर तरुणाचा या टोळीचा अखेरच्या काळात संबंध आला होता अशी चर्चा शहरात सुरु आहे.हि टोळी सदर पुरवठा विभाग आणि रेशनच्या दुकानाशी संबंधित असून तेथील नागरिकांकडून कमी किमतीत घेऊन तो काळ्या बाजारात विकत असून त्यातून ते मोठी कमाई करत आहे.यात सामील काही आरोपी कारागृहात राहून हि टोळी चालवत असल्याचे समजते.व त्यासाठी येथील कारागृहात दाटीवाटीने राहण्यासाठी ते मोठी किंमत चुकवत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.मात्र त्याकडे नागरिक,पोलीस,महसूल,पुरवठा विभाग हा सोयीस्कर कानाडोळा करत असल्याची माहिती आहे.

दरम्यान एका माहितीनुसार सदर तरुणास डोक्यास जखम असल्याची माहिती हाती आली आहे.तो पाण्यात पडण्यापूर्वी जिवंत होता व त्याचे शव हे पाण्यात पडल्यावर किंवा आत्महत्या केली असल्यास फुगणे क्रमप्राप्त होते मात्र ते फुगलेले नव्हते हे विशेष ! म्हणजेच त्यास आधी मारहाण करून त्याची आत्महत्या दाखविण्यासाठी त्यास गोदावरीत टाकून संशयित आरोपीनी सदर गुन्ह्यावर पांघरून घालण्याचा सोयीस्कर प्रयत्न केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.त्यामुळे नव्याने दाखल झालेले पोलीस अधिकारी काय भूमिका घेणार हे लवकरच समजणार आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ना.बी.एम.कोरेकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close