निधन वार्ता
इंदुबाई गीते यांचे निधन

न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशुमख येथील रहिवासी इंदुबाई लहानू गिते (वय-८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,तीन मुली,सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व.इंदूबाई गीते या माहेगाव देशमुख व परिसरात धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिसरात प्रसिद्ध होत्या.त्या मंजूर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी सचिव लहानू गीते यांच्या पत्नी होत्या.नाशिक येथील माजी उपविभागीय वन अधिकारी बाळासाहेब लहानू गीते यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.