जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

सुरेगावात …त्या आरोपीच्या अटकेसाठी झाला विविध संघटनांच्या वतीने “रास्ता रोको”

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व आरोपीला अटक करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांनी गाव बंद करून शिर्डी-लासलगाव मार्गावर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सुरेगाव शाखेसह विविध संघटनांच्या वतीने नुकताच दोन तास “रास्ता रोको”आंदोलन आरोपीला आठ दिवसात अटक करण्याची जोरदार मागणी करून पोलीस प्रशासनाला अडचणीत आणले आहे.

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करावी या मागणी साठी सुरेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला त्याचे छायाचित्र.

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या व मजुरी करून आपला चरितार्थ चालविणाऱ्या कुटुंबातील नऊ वर्षाची अल्पवयीन मुलगी तेरा डिसेंबर रोजी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यावर घरी न परतताच बेपत्ता झाल्याने वेळापूर परिसरात खळबळ उडाली होती.तिच्या नातेवाईकांनी आसपास नातेवाईक व ओळखीच्या माणसांकडे शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिच्या पालकांनी कोपरगाव तालुका पोलिसांकडे ती अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार त्याच रात्री सव्वा दहाच्या सुमारास केली होती.त्यामुळे पोलीस अधिकारीही चक्रावून गेले होते.त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चलचित्रणाच्या फिती तपासल्या असता ती एका तरुणाबरोबर एका दुचाकीवर पुढे टाकीवर बसून जात असल्याचे आढळून आले होते.त्या नंतर सदर मुलगी या आरोपीने सकाळी लासलगाव-शिर्डी रस्त्यावरील काळे सहकारी कारखान्याकडे जाणाऱ्या कमानीं जवळ सोडून तो परागंदा झाला होता.त्यांनतर गायब मुलगी सापडल्यावर तिची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले होते.

दरम्यान सुरेगाव,कोळपेवाडी,वेळापूर,कोळगाव थडी, येथील नागरिकांनी आपले गाव बंद करण्याचा निर्णय घेतला असून आज त्या संबंधी शिर्डी लासलगाव रस्त्यावर त्याची शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून हे आंदोलन केले आहे.आठ दिवसात आरोपीला पोलिसांनी जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या रस्ता रोको आंदोलनाच्या वेळी काही महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.आंदोलनात हजारो नागरीक ,महिला,युवतींचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी आंदोलकांनी पोलीस व महसूल यंत्रणेला आपले विविध मागण्याचे निवेदन दिले. निषेध मोर्चा ,रास्ता रोको व बंद यशस्वी करण्यासाठी दि.बुध्दिष्ट सोसायटी आँफ इंडिया ,समता सैनिक दल व भिमक्रांती मित्र मंडळाचे अरूण लोंढे ,आर.पी.आय.उत्तर विभाग प्रमुख दीपक गायकवाड, सिध्दार्थ मेहरखांब ,रमेश निकम ,राहूल जगधने ,मोतीराम निकम,विजय गायकवाड , अंबादास मेहरखांब ,अशोक पगारे ,राहूल बनकर ,शिवा पगारे ,प्रविण मोकळ ,देवेंद्र मोकळ ,अमोल मोकळ ,सुर्यकांत निकम तसेच विजय क्रांती गु्प गौतमनगर यांनी प्रयत्न केले.तर सुत्रसंचलन अरूण लोंढे यांनी तर निवेदनातील मागण्या व आभार सिध्दार्थ मेहरखांब यांनी केले यावेळी गौतमनगर ,सुरेगाव ,वेळापूर ,कोळपेवाडी ,शहाजापूर ,कोळगावथडी ,मढी बु,माहेगाव देशमूख ,मंजूर परिसरातील ग्रामस्थ ,व्यापारी ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close