जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे
साकुरी- (प्रतिनिधी)
शिर्डी शहरात सध्या रोडच्या कडेला लहानमोठा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनी कचरा केला या कारणाखाली दुर्बल व्यावसायिकांना पाचशे ते दोन हजाराची पावती शिर्डी नगरपचायतचे आतिक्रमण विभागाचे कामगार माथी मारत असल्याचे दिसुन येत आहे.ज्यांना राजकीय पाठबळ नाही त्यांना वेठीस धरण्याचे नसते उद्योग पालिका कर्मचारी करून या व्यावसायिकांना वेठीस धरत असल्याने त्यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून त्यांच्या या अन्यायाच्या विरोधात आपण आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे कार्यक्रते विशाल कोळगे यानी दिला आहे.
शिर्डी शहरात हजार दोन हजाराच्या पावत्या या फेरीवाल्यांच्या माथी मारण्याचे काम जोरात सुरु आहे.असे आर्थिक शोषण करण्याचा आधिकार नगरपंचायतीला कोणी दिला ? गरिबाना आधिकारी वेठीस धरत आहे. नगरसेवक या बाबत का मौन पाळत आहे. शहरात मुख्यधिकारी यांनी फेरफटका मारावा मग सगळे सत्य बाहेर येईल-विशाल कोळगे
शिर्डी हे आंतराष्ट्रीय तीर्थक्षेत्र नावाजले असल्याने येथे उदरनिर्वाह करण्यासाठी येणाऱ्या नजीकच्या ग्रामस्थांची संख्या मोठी आहे.त्यामुळे शहरात रस्त्याच्या कडेला अनेक जण बसून आपल्या रोजीरोटीसाठी बसताना आढळत आहे. आठशे रुपयाच्या हातगाड्याला दोन हजाराचा कचरा केला असा आरोप करून केवळ दुकान लावले म्हणुन जर नगरपचायत देत असेल तर साईच्या शिर्डी नगरीत गरीबाला एक न्याय आणी श्रीमताला एक न्याय असा भेदभाव कदापीही सहन केला जाणार नाही असा इशारा विशाल कोळगे यानी दिला आहे. या बाबतचा प्रकार थाबला नाहीतर जिल्हाआधिकारी, आ. राधाकृष्ण विखे, खा. सुजय विखे याचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी दिलेल्या पञकात म्हटले आहे.
सामान्य माणूस लहान- मोठा व्यवसाय करुण रोडच्या कडेला नगर मनमाड रोडवर पोट भरतो.शिर्डी शहरात बऱ्याच वेळा गर्दी नसताना हि ठेकेदाराची व्यवसाय पावती भरताना या व्यावसायिक व फेरीवाल्यांच्या नाकी नऊ येत आहे. शिर्डीत गर्दी होत नसताना व कचरा केल्याचा व दूकान लावल्याचा आरोप करून हजार दोन हजाराच्या पावत्या या फेरीवाल्यांच्या माथी मारण्याचे काम जोरात सुरु आहे.असे आर्थिक शोषण करण्याचा आधिकार नगरपचायतीला कोणी दिला ? गरिबाना आधिकारी वेठीस धरत आहे. नगरसेवक या बाबत का मौन पाळत आहे. शहरात मुख्यधिकारी यांनी फेरफटका मारावा मग सगळे सत्य बाहेर येईल. केवळ कारवाई फक्त दुर्बलांवर नगरपंचायत करणार असेल तर या प्रकाराची चौकशी करण्यासाठी वेळप्रसगी जिल्हाआधिकारी यानां पुराव्यासह माहीती देण्यासाठी आपण मागेपुढे पहाणार नाही व वेळप्रसगी आपण आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.