नगर जिल्हा
सहकाराचे जाळे उध्वस्त करण्याचा सरकारचा हेतू-थोरात
संपादक-नानासाहेब जवरे
साकुरी- (प्रतिनिधी)
राज्यात ३०५ बाजार समित्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या बाजारपेठेचे चांगले कामकाज सुरू असुन हजारो भुमिपुत्राना रोजगार मिळाला असताना उघड लिलाव पद्धतीने शेतकरी माल विकतो रोख पैसे मिळतात त्याची हमी बाजार समिती घेते असे असताना ई,नाम पध्दत शेतकरी लोकांना पसंत नसताना ई,नाम आग्रह कशासाठी हा खरा प्रश्न पुढे आला आहे. बाजार समिती मध्ये वाहनांमध्ये शेतमाल येतो तो गोण्या मधुन आणला जात नाही त्यामुळे ई,नाम प्रणाली राबवणे कठीण आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी पुर्णपणे उध्वस्त झाला आहे महाराष्ट्रात सहकाराचे जाळे उभे राहिले आहे.त्यामागे सहकारातील अनेक नेत्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आज वेगळा ठसा उमटविला असताना राज्यात ३०५ बाजार समित्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या बाजारपेठेचे चांगले कामकाज सुरू असुन हजारो भुमिपुत्राना रोजगार मिळाला असताना उघड लिलाव पद्धतीने शेतकरी माल विकतो रोख पैसे मिळतात त्याची हमी बाजार समिती घेते असे असताना ई,नाम पध्दत शेतकरी लोकांना पसंत नसताना ई,नाम आग्रह कशासाठी हा खरा प्रश्न पुढे आला आहे. बाजार समिती मध्ये वाहनांमध्ये शेतमाल येतो तो गोण्या मधुन आणला जात नाही त्यामुळे ई,नाम प्रणाली राबवणे कठीण आहे त्याच वेळी ई, नाम मधुन शेतमाल इतर ठिकाणांहून खरेदी झाल्यावर तो व्यापारी कधी येणार तो पर्यंत शेतमाल कोण सांभाळणार त्याची प्रतवारी ग्रेडेशन कोण करणार असे विविध प्रश्न उभे राहणार आहेत. शिवाय व्यापाऱ्याने फसविले तर पैशाची जवाबदारी कोणाची ? यांचे उत्तर मिळत नाही आता शेतमाल खरेदी साठी परवाना दिला जातो त्यावेळी व्यापारी ची मालमत्ता सह बारीक सारीक माहिती असते पैसे बुडणार नाही याकडे बाजार समितीच्या संचालक मंडळाचे बारीक लक्ष असते. असे असताना सहकार संपविण्याचा केन्द्र सरकार चा डाव तर नाही ना ? अशी शंका उपस्थित करुन यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने या बाबतीत फेरविचार करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुरेश थोरात यांनी शेवटी सांगितले आहे.