जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

लाचेची मागणी करणाऱ्या दोन पोलीसांवर,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

एका दुचाकीतील चोरीच्या गुन्ह्यात आपल्याला अटक करू नये व मदत करण्याच्या मोबदल्यात शिर्डी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस शिपाई ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर व विशाल पी.मैद या दोघाना चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी पुणतांबा फाटा पंचासमक्ष केल्याने नगर येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान गुन्हा 22 नोव्हेंबर रोजी घडूनही त्यांनतर लाचलुचपत विभाग त्यांना रक्कम घेण्यासाठी आठ दिवस प्रयत्नशील होता मात्र आरोपी पोलिसांना त्याची खबर मिळाल्याने ते सदरची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर या विभागाने आज दुपारी साडेतीनच्या सुमारास या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याची विश्वसनिय बातमी आहे.एकदा तर शिर्डी पोलिसांना फिर्यादी सागर सय्यद हे पैसे देण्यासाठी गेले असता आपल्या कार्यालयाचा दरवाजा बंद केल्याची माहिती हाती आली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव येथील रहिवाशी तरुण सागर मेहमूद सय्यद यांचे येवला रस्ता कोपरगाव या ठीकाणी विविध कंपनीच्या दुचाकी खरेदी विक्रीचे दुकान असून कोपरगाव बागुल वस्ती येथील बंडू जगताप नावाच्या एका युवकाने त्यांच्याकडून मे 2018 रोजी एक बजाज पल्सर कंपनीची दुचाकी खरेदी केली होती.त्याने ती संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील बाजारात ती अज्ञात इसमास अदलाबदल करून विकली असल्याची माहिती समजते.दरम्यान शिर्डीत दरम्यान शिर्डीत एका परप्रांतीय महिलेची पर्स ओढताना काही चोरटे पकडण्यात आले होते.त्यात हि प्लसर गाडी सापडल्याने शिर्डी पोलिस शिपाई ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांनी दुचाकी दलाल सागर सय्यद व त्यांचा भाऊ मोहसीन सय्यद यांचेकडिल असल्याचा बहाणा करून सागर सय्यद त्याचा भाऊ मोहसीन सय्यद व त्यांच्याकडे काम करणारा राहुल काकडे यांची नावे वगळण्यासाठी पन्नास हजारांची मागणी केली शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी केली होती.त्यात तडजोड होऊन ती रक्कम चाळीस हजार रुपये करण्यात आली.

त्यावेळी हि रक्कम जास्त व अन्यायकारक वाटल्याने या दोघांनी या बाबत अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून न्याय मागितला होता.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोपरगाव नजीक असलेल्या पुणतांबा चौफुलीवर शुक्रवार दि.22 नोव्हेंबर रोजी साडेचारच्या दरम्यान सापळा लावला होता.त्यात फिर्यादी सागर सय्यद व त्याचा भाऊ मोहसीन सय्यदव त्यांच्याकडे काम करणारा मुलगा राहुल काकडे यांना अटक न करण्याच्या मोबदल्यात चाळीस हजार रुपये देण्याची चर्चा तेथे असलेल्या पंचासमक्ष चालू असताना आरोपी पोलीस शिपाई सुपेकर व मैद यांना संशय आल्याने त्यांनी पोबारा केला होता.दरम्यान या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी एच.डी. खेडकर यांनी समक्ष भेट देऊन पाहणी करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.नं.394/2019 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन.1988 चे कलम 7 प्रमाणे आरोपी ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक दैपाक करांडे हे करीत आहेत.दरम्यान या प्रकरणामुळे पोलीस विभागात चालत असलेला भ्रष्टाचार उघड झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close