नगर जिल्हा
गंगागिरी सप्ताहसाठी मोटारसायकल रॅलीचे आयोजन
संपादक-नानासाहेब जवरे
श्रीरामपूर (प्रतिनिधी )
येथील बालसंन्यासी हरीबाबा पुण्यतिथीनिमित्त किर्तनासाठी महंत रामगिरीमहाराज येथे आले असता सप्ताहची मागणी केली.दि २२ नोव्हे.पूर्वी गावोगाव सर्वाना माहिती देण्यासाठी शिरसगाव व परिसरात पंचक्रोशीतील गावात जाऊन ग्रामसभा,महिला ग्रामसभा,बचत गट,आदी बैठका घेण्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रमाणे इंदिरानगर,दत्त मंदिर चौक,प्रगतीनगर पाणी टाकीजवळ,गोन्धवणीरोड फेरी,रामकृष्णनगर हनुमान मंदिर,रामचंद्रनगर अप्पा कुलकर्णीजवळ बैठक,खैरी निमगाव रोड फेरी,ब्राम्हणगावरोड फेरी,गावठाण,महाराणा प्रताप सोसायटी,फेरी,इंदिरानगर,रामकृष्णनगर फेरी,तसेच वडाळा महादेव,खोकर,भोकर,भैरवनाथ नगर,गोंधवनी,बेलापूर आदी पंचक्रोशीतील गावांना भेटी देऊन सप्ताहची माहिती दिली बैठका घेतल्या त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.श्रीरामपूर नगराध्यक्षा अनुराधा आदिक,उपनगराध्यक्ष करण ससाणे,सर्व नगरसेवक,प.स.सभापती दीपक पटारे,सर्व सदस्य,आ.लहू कानडे,खा सदशिव लोखंडे,माजी आ,भानुदास मुरकुटे,मा.आं.भाऊसाहेब कांबळे,जि.प.सदस्य.आदींची समक्ष भेट घेतली व फेरीत सहभागी होण्याचे शिरसगावकरांनी आवाहन केले.त्यांनी हा उत्साह पाहून आनंद व्यक्त केला व सप्ताहसाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.नियोजनाप्रमाणे विविध गावातील हजारो ग्रामस्थ २२ नोव्हे.रोजी विठ्ठल मंदिर शिरसगाव येथे जमणार असून पांढरा ड्रेस व टोपी परिधान करून ग्रामस्थ,सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,झेंडे लावून मोटारसायकलने सकाळी ८ वाजता रेकॉर्डब्रेक फेरीने कोठेही न थांबता शिरसगाव इंदिरानगर, उड्डाणपूल,गझल हॉटेल,म.गांधी पुतळा,मेन रोड,नाना टी सेंटर,शिवाजी रोड,शिवाजी चौकातून वेस्टर्न चौक, गोंधवणी, खैरी,नाउर,सावखेडगंगा,मार्गे सरला बेट येथे जाऊन महंत रामगिरी यांना भेटून संत योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहची मागणी करणार आहेत.श्रीरामपूर शहरात विविध ठिकाणी स्वागत होईल.फेरी दरम्यान श्रीरामपूर शहरात वाहतूक कोंडी काही वेळ होत असल्याने सर्वांनी सहकार्य करावे.दि.२२ नोव्हे.रोजी होणाऱ्या मोटारसायकल फेरीत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामस्थ व संयोजकांनी केले आहे.