नगर जिल्हा
टाकळीभानमध्ये एकाच रात्रीत तीन चोऱ्या,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे गेली काही दिवसांपासुन थांबलेले चोऱ्याचे सञ पुन्हा एकदा सुरु झाले असून. काल बुधवारी राञी चोरट्यांनी येथील टपाल कार्यालयासह एका सराफाचे दुकान व ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या ए.टी.एम. प्लँटच्या काही उपकरणांची चोरी केल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या या तिन्ही ठिकाणांवर बुधवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारल्याने व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.
टाकळीभान येथे पुन्हा चोऱ्या सुरु झाल्या आहेत. येथील जुन्या ग्रामसचिवालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पोस्टाचे कार्यालय आहे. बुधवारी राञी चोरट्यांनी या गेटचे कुलुप करवतीने कापुन कार्यालयाकडे प्रवेश केला. ग्राम सचिवालयाच्या कार्यालयाच्या दरवाजाचा कोयंडा व कुलुप कापुन आत प्रवेश केला. टेबल व कपाटाची उचकापाचक करून भिंतित मजबुतपणे लावण्यात आलेल्या तिजोरीचे कुलुप तोडून तिजोरीतील २० हजार रुपयाची रोकड घेवुन चोरट्यांनी पोबारा केला. चोरट्यांनी कार्यालयात असलेलेल्या संगणक, प्रिंटर व इतर साहीत्याला मात्र हातही लावला नाही हे विशेष!
त्यानंतर याच इमारतीच्या तळ मजल्यात ग्रामपंचायतीने बसविण्यात आलेल्या पाण्याच्या ए.टी.एम. प्लँटचे कुलुप त्याच पध्दतीने तोडुन या प्लँटमधील महागड्या वस्तुंची चोरी केली आहे. त्यानंतर येथुन दिडशे फुटाच्या अंतरावर सलेल्या अजय बिरारी यांच्या स्वामी अलंकार गृहाच्या शटरचे कुलुप तोडुन चोरट्यांनी दुकाणातील चांदीचे घोडे व इतर चांदिचे असे २ हजार ५०० ते ३ हजार रुपयाचे दागिने चोरुन नेले.