जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचनाची सवय आवश्यक-प्राचार्य डांगे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

विद्यार्थ्याने पुस्तकांशी मैत्री करायला हवी, वाचन संस्कृती रुजवायला हवी, ‘‘जी जी माणसं आपल्या कार्यकर्तृत्वाने मोठी झाली त्याच्या जीवनात पुस्तकांचे स्थान अढळ आहे. जर यशस्वी व्हावयाचे असेल तर प्रत्येकाने वाचनाची सवय जोपासली पाहिजे. असे प्रतिपादन आत्मा मलिक गुरुकुलाचे प्राचार्य निरंजय डांगे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

आत्मा मालिक ध्यानपीठ संचलित आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी नुकताच वाचन प्रेरणादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

सदर प्रसंगी गुरुकुलात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला बॅंन्ड पथकासह ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यात विद्याथीनिर्मित घोषवाक्यांचे फलक व कलामांच्या स्फूर्तीदायी विचारांची आरास मांडण्यात आली होती.

याप्रसंगी व्यासपीठावर गुरुकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेष कालेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब कराळे, रवींद्र देठे, सुनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने गुरुकुलातील ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘चला पुस्तक वाचूया’ या अंतर्गत ‘वाचन कट्टा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध प्रेरणादायी पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलामांच्या जीवनकार्याचा परिचय इ.10 वी चा विद्यार्थी हर्श चौधरी याने करुन दिला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चि.चंद्रशेखर पाटील व चि.प्रणव बोरसे या विद्यार्थ्यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुकुलातील सांस्कृतिक विभाग प्रमुख रोहिणी सूर्यवंशी, आनंदराव पद्मर, गणेष कांबळे, अविनाश चौधरी, शुध्दोधन ससाणे, अनंत कोरे, रिना मतसागर आदींनी परिश्रम घेतले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close