कोपरगाव तालुका
वारीत कोरोना योद्ध्यांचा सन्मान संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील भगवे वादळ मित्र मंडळाने कोरोना च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करता सामाजिक जबाबदारी स्वीकारत सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळत कोरोना काळात जिवाची पर्वा न करता सेवा देणारे डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,आशा सेविका, पोलीस,ग्रामपंचायत कोविड समितीचे अध्यक्ष तथा सरपंच ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी,विज मंडळ कर्मचारी, शिक्षक, पत्रकार अशा सर्व कोविड योद्ध्यांचा सन्मान करुन सेवे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्यानंतर झालेल्या रक्तदान शिबिरात संजीवनी रक्त पेढी च्या माध्यमातून सुमारे पन्नास पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
भगवे वादळ मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष संदिप जाधव यांनी प्रास्ताविक केले
यावेळी पत्रकार रोहित टेके,ग्रामसेवक प्रशांत बरबडे,माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे यांनी मनोगत व्यक्त करत सामाजिक कार्यात नेहेमीच अग्रेसर असणाऱ्या भगवे वादळ मित्र मंडळाचे कौतुक केले आहे.
यावेळी तलाठी वडीतके, डॉ पाखरे,डॉ टेके,डॉ तांबे,डॉ. दरेकर माजी सरपंच बद्रीनाथ जाधव,उपसरपंच विशाल गोर्डे,पत्रकार दत्ता गोर्डे ,फकीर टेके, प्रल्हाद मेहेरे ,रौदाळे सर आदी उपस्थित होते सूत्रसंचलन रयतचे रमेश गायकवाड सर यांनी केले आहे.
कार्यक्रम यशस्वी ते साठी अशोक गायकवाड,मनोज वरकड,सनी टेके,रामेश्वर कानडे,अक्षय भगुरे,यश सोनार, गोपाल करवा,महावीर संचेती,धनंजय कवडे,राहुल कोकाटे,राहुल शिंदे,जितेंद्र टेके,गणेश जाधव,रामेश्वर जाधव, गणेश थोरात,वसीम शेख,रवी मोरे,अतुल शिंदे,शुभम टेके,सुदर्शन कवाडे,सुमित नेवगे,कपिल वाघ यांचे सह मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले आहे.