नगर जिल्हा
जेष्ठ कार्यकर्ते कमलाकर जगताप यांचे निधन
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते कमलाकर दगुजी जगताप (वय-75) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर कोपरगाव अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.कमलाकर जगताप हे अत्यंत मृदू स्वभावाचे गणले जात त्यांनी कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यात आंबेडकरी चळवळ वाढविण्यासाठी मोठे योगदान दिले होते.त्यांना भारतीय रिपब्लिकन पार्टीत तथा आठवले गटात “मामा” या टोपण नावानेच ओळखले जात होते.त्यांनी आंबेडकरी चळवळीत तीस वर्ष काम केले होते.प्रारंभी ते दलित पँथरचे पंधरा वर्ष तालुका सचिव म्हणून कार्यरत होते.तर आर.पी.आय.चे गत आठ वर्षांपासून जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते ते केंद्रीय राज्यमंत्री तथा आर. पी.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे निष्ठावान कार्यकर्ते होते.त्याच्या अंत्यविधी समयी आर.पी.आय.चे उत्तर विभाग प्रमुख दीपक गायकवाड.शहराध्यक्ष जितेंद्र रणशूर,जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ,बाळासाहेब आढाव,शरद खरात,अल्ताफ कुरेशी,राजू उशिरे, आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.