कोपरगाव तालुका
पाच वर्षात तालुक्याचे भरून न येणारे नुकसान झाले – आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याची पाच वर्षे सत्ता देऊनही तालुक्याच्या आमदारांना विकास करता आला नसून कोपरगाव तालुक्याचे मागील पाच वर्षात भरून न येणारे नुकसान झाले असल्याची टीका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी येथे एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोलपेवाडी येथे राष्ट्रवादीचे नेते आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यकर्ता मेळाव्यासाठी माजी आ.अशोक काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोपरगाव तालुक्याच्या आमदार मुग गिळून गप्प बसल्या होत्या. तालुक्याच्या आमदारांनी सत्य परिस्थिती न मांडल्यामुळे कोपरगाव तालुका दुष्काळी अनुदानापासून वंचित राहिला.
त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, ज्यावेळी कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला त्यावेळी कोपरगाव तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असूनही कोपरगाव तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला गेला. त्यावेळी तालुक्याच्या आमदार मुग गिळून गप्प बसल्या होत्या. तालुक्याच्या आमदारांनी सत्य परिस्थिती न मांडल्यामुळे कोपरगाव तालुका दुष्काळी अनुदानापासून वंचित राहिला. माजी आ. अशोक काळे यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणी यांचे प्रश्न मार्गी लागले मात्र मागील पाच वर्षात तालुक्याची अवस्था विकासाच्या बाबतीत अतिशय वाईट झाली आहे.
जिल्ह्यातील ११ तालुक्यांना जवळपास ४३ कोटी रुपयांचे अनुदान मिळाल्याची माहिती समजली असून जर आपला तालुका दुष्काळाच्या यादीत सामावेश झाला असता तर तालुक्याच्या नागरिकांना दुष्काळी अनुदान मिळाले असते. कोपरगाव तालुक्याचा दुष्काळी यादीत सामावेश व्हावा यासाठी आमरण उपोषण केले. न्यायालयात गेलो. आपण तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत सामावेश व्हावा यासाठी प्रयत्न करीत असतांना तालुक्याच्या आमदारांनी टीका करण्यात धन्यता मानली त्यांच्यामुळेच कोपरगाव तालुक्याच्या जनतेला दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे अशा अकार्यक्षम आमदारांना आता घरी बसवा असे आवाहन त्यांनी शेवटी कार्यकर्त्यांना केले आहे.