
धनगरवाडी (वार्ताहर )
दरम्यान चितळी रेल्वे स्थानक येथे भुयारी पुलाखाली पाणि साचत आहे तेथे शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांनी भेट दिली असता तेथे इंजिन लावुन पाणी उपसत असल्याचे दिसून आले आहे.त्याच वेळी चितळी ते श्रीरामपुर या मार्गावरील भुयारी पुलाखाली पाणी साचलेले असते तेथे इंजिन बसविले असते तर आज कदाचित या मेंढ्यांची जीवितहानी वाचली असती.त्यामुळे अपघातास संबधित ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचे आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या बावन्न नंबर चौकीच्या (यशवंत बाबा चौकी) भुयारी मार्गा जवळ रेल्वे रुळ ओलांडत असतांना रेल्वे इंजीनची जोरदार धडक बसुन काही दिवासापूर्वी ४० मेंढ्या मृत झाल्या होत्या.रेल्वेने निर्माण केलेल्या या भुयारी मार्गावर चार ते पाच फुटांपर्यंत पाणि साचल्याने मेंढपाळाने आपल्या मेंढ्या रुळावरुन नाविलाजाने न्याव्या लागल्या होत्या.यात त्याचा कोणताही दोष नव्हता.परिणामस्वरूप हा अपघात घडला होता.जर भुयारी पुलाखाली पाणि साचले नसते तर मेंढ्या पुलाखालुन गेल्या असत्या परिणामस्वरूप अपघात टळला असता.त्यामुळे या अपघाताची संपुर्ण जबाबदारी रेल्वे ठेकेदाराची आहे.हे सिद्ध होत आहे.त्यामुळे संबधित ठेकेदारास जबाबदार धरुन त्याच्यावर कारवाई करावी व या आर्थिक दुर्बल मेंढपाळास भरपाई म्हणून आर्थिक मोबदला द्यावा अशी रास्त मागणी यशवंत सेनेने केली आहे.जर संबंधितांनी भरपाई दिली नाही तर यशवंत सेना आठ दिवसात मोठे आंदोलन उभारेल असा इशारा यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी दिला आहे.
दरम्यान चितळी रेल्वे स्थानक येथे भुयारी पुलाखाली पाणि साचत आहे तेथे शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांनी भेट दिली असता तेथे इंजिन लावुन पाणी उपसत असल्याचे दिसून आले आहे.त्याच वेळी चितळी ते श्रीरामपुर या मार्गावरील भुयारी पुलाखाली पाणी साचलेले असते तेथे इंजिन बसविले असते तर आज कदाचित या मेंढ्यांची जीवितहानी वाचली असती.त्यामुळे अपघातास संबधित ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचे असून प्रशासन अद्याप मोठ्या अपघाताची वाट बाघत आहे का ? असा तिखट सवाल त्यांनी केला आहे.या पुढे देखिल कोणत्याही पुलाचे काम नादुरुस्त असल्याने कुठल्याही प्रकारच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने या पुढील कुठल्याही अपघाताची जबाबदारी ही संपुर्णपणे संबधित ठेकेदाराची राहिल असा इशारा धनगरवाडी येथिल आहिल्यादेवी प्रतिष्ठानचे ध्यक्ष साहेबराव आदमाने यांनी दिला आहे.यावेळी भुमीपुञ शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष,यशवंत सेनेचे अध्यक्ष विजय तमनर संजय वडितके,महेश तमनर,प्रविण ओहळ,सचिन गवते,अतुल वडितके,बाजीराव मडके,रावसाहेब साखरे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.