जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

“ते”स्मारक पुन्हा उभारावे अन्यथा आंदोलन,इशारा

जाहिरात-9423439946

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचे बेळगाव नजीक असलेल्या मनगुत्ती गावातील स्मारक काढून टाकले आहे हि बाब निश्चितच वेदनादायी असल्याने ते स्मारक पंधरा दिवसात पुन्हा उभारावे अन्यथा सकल मराठा मोर्चा च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा समाजाच्या कोपरगाव शाखेच्या वतीने कोपरगावचे तहसीलदार यांना नुकतेच देण्यात आले आहे.

कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी माणसांचा किती द्वेष करते याचं आणखी एक संतापजनक उदाहरण मनगुती गावात उघड झाले आहे. बेळगाव जिल्ह्यातील मनगूती गावात तेथील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.कोपरगावही त्याला अपवाद नाही.

कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी माणसांचा किती द्वेष करते याचं आणखी एक संतापजनक उदाहरण मनगुती गावात उघड झाले आहे. बेळगाव जिल्ह्यातील मनगूती गावात तेथील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.मनगुत्ती गावात ही घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात पुतळा हटवल्याचा गावकऱ्यांनी तीव्र निषेध केला असून तिथे मनगुत्ती गावात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त संतापले आहेत त्यात कोपरगावचा अपवाद नाही.

कोपरगावात येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आज कोपरगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्ववत बसविण्यात यावा आशिया मागणी करण्यात आली आहे.हि मागणी पूर्ण न केल्यास निर्माण होणाऱ्या असंतोषास शासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर बाळासाहेब आढाव,भरत मोरे,अनिल गायकवाड,अशोक आव्हाटे, दिनेश पवार,सुनील साळुंके आदींच्या सह्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close