नगर( प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडणुक लढविणार असल्याची खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांनी केलेली घोषणा हवेत विरली आहे. गांधी यांचे हे बंड आता थंड झाले असुन मी निवडणुक लढवणार नाही सुवेंद्र गांधी यांनी अशी घोषणा केली आहे. त्यामुळे नगर दक्षिण मतदार संघात दुरंगी लढत रंगणार आहे.
भाजपा उमेदवार डाँ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करुन उमेदवारी मिळविल्यानंतर खासदार दिलीप गांधींचा पत्ता कट झाला. त्यामुळे गांधी पितापुत्र कमालीचे नाराज झाले होते. नगरला घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सुवेंद्र गांधींनी अपक्ष निवडणुक लढविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उमेदवारी अर्ज ही घेतला होता. गांधीची ही नाराजी विंखेंसाठी डोकेदुखी ठरणार असल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखेंनी गांधीची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न चालविला होता.मात्र तरीही सुवेंद्र उमेदवारीवर ठाम होता. मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुन्हा भेट घेवुन चर्चा केली. या चर्चेतुन अखेर सुवेंद्र गांधी यांचे बंड अखेर थंड झाले आणि निवडणुकीतुन माघार घेत असल्याची घोषणा केली.