अहमदनगर (प्रतिनिधी )– ‘माझा मुलगा आता लहान नाही,तर त्याला भाषणही करता येते’ असे म्हणत काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोला लगावला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र आणि मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांचे नाव न घेता टीका केली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे आपल्या पहिल्याच भाषणात अडखळले होते. त्यानंतर राजकीय स्तरातून मोठ्या प्रमाणावर पार्थ पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती. तसेच डॉ. सुजय विखे यांच्यासाठी नगरची जागा सोडण्यावरून विखे आणि पवार असा वादही रंगला होता. त्यावरून शरद पवार यांनी आपण दुसऱ्याच्या मुलाचे हट्ट का पुरवायचे असा सवाल करत विखेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यावरून काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केला आहे.
जाहिरात-9423439946