नगर ( प्रतिनिधी)-काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपाचे नाराज खासदार दिलीप गांधी यांनी भेट घेतली आहे. नगर जिल्ह्यात काँग्रेस आघाडीचा प्रचार करणार नाही असे ठणकावुन सांगणार्या विखे पाटलांनी पुत्र सुजय विखे साठी भाजपात नाराज असलेल्या दिलीप गांधीची भेट घेवुन राजकीय खलबते केली आहे.
नगर दक्षिण मतदार संघातुन ऊमेदवारी नाकारल्याने सध्या दिलीप गांधी भाजपामध्ये नाराज झाले आहेत. गांधीचे पुत्र सुवेंद्रने बंडाचा झेडा फडकवला आहे. सुजय विखेंना भाजपात प्रवेश देवुन उमेदवारी दिल्यानेच दिलीप गांधीचा पत्ता कट झाला.त्यामुळे गांधीची नाराजी दुर करण्यासाठीच विखे पाटिलांनी ही भेट घेतल्याचे बोलले जाते.