पारनेर वार्ताहर –
पिंपळनेर येथील पांडुरंग वसंत गाजरे यांनी जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेच्या कँशियर कडुन जादा आलेले चाळीस रुपये जिल्हा बँकेला परत केले .गाजरे यांनी दाखविलेला प्रामाणिक पणा पारनेर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
सध्या मार्च एन्डची लगबग असल्याने तसेच पिक विमा आल्याने बँकामध्ये गर्दी जास्त आहे त्यात ६०० रु वाले यात जिल्हा सहकारी बॅक पारनेर शाखेत गर्दी वाढल्याने सोमवार दि २४ / ०३ / २०१९ रोजी पिंपळनेर येथिल खातेदार श्री पांडुरंग वसंत गाजरे यांना उसाचे पेमेंट करताना बॅकेतुन ४००००रु जादा आले घरी गेल्यानंतर त्यांच्या हि गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी बॅकेला आपला प्रामाणिकपणा दाखवला व पैसे परत केले . ए डि सी सी बॅकेत त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी बँकेचे शाखाधिकारी श्री कांडेकर साहेब श्री पुजारी साहेब श्री औटी साहेब श्री लोंदे साहेब तसेच श्री श्री रंग वसंत गाजरे श्री भाउ साहेब खामकर हे उपस्थित होते