जवळा(प्रतिनिधी ) -पारनेर तालुक्यातील जवळा परिसरातील निघोज पोलीस चौकीच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था पुरती कोलमडून गेली आहे .राळेगण थेरपाळ, जवळा ,सांगविसूर्या , गुणोरे ,म्हसे, आदी भागातील गावामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच आहे .तसेच या परीसरात दिवसा ढवळ्या ,रात्री अपरात्री , खुनासारखे प्रकार चोऱ्या, मारामाऱ्या, रस्तालुटी , हाणामाऱ्या यासारख्या घटना खुलेआम घडत आहेत.
जवळा शिरूर राज्यमार्गावर अवैध दारू, बनावट दारू ,मटका, गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर तर नावाला सुद्धा उरला नसल्याचे चित्र जवळा परिसरात पाहायला मिळत आहे .त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे राहणे जोखमीचे होऊ लागले आहे .
निघोज पोलीस चौकी अंतर्गत जवळा , राळेगण थेरपाळ, कुरुंद, कोहकडी, म्हसे गुणोरे ,गाडीलगाव
आदी पट्ट्यातील गावे येतात त्याशिवाय रांजणगाव( शिरूर ) ,सुपा( पारनेर ) आशा प्रकारच्या मोठया औद्योगिक वसाहती अगदी गावांच्या उशालाच असंल्याने जमिनीचे वाढलेले भाव , संपत्तीचा वाद , एकमेकांची खुन्नस, राजकारण, या वादातून खून मारामाऱ्या, अशा घटना सतत घडत आहेत .जवळा- शिरूर हा राज्यमार्ग ( नुकताच मंजुरी मिळालेला राष्ट्रीय महामार्ग) या रस्त्याच्या बाजूला अनेक धाबे , हॉटेल्स, मधून अवैध व बनावट दारूची विक्री सर्रास होताना दिसते .सांगविसूर्या जवळा गावात तर चाळीस वर्षा पासून दारू
बंदी झालेली असताशा सुद्धा दोन्ही गावात देशी, विदेशी , हातभट्टी, ताडी चा महापूर वाहताना दिसत आहे.सदर व्यव्यसाय करण्यासाठी दारूबंदी खात्याचा परवाना नाही अन्न प्रशासन विभागाची परवानगी नाही पण तरीही सर्व काही आलबेल सुरू आहे. येथील अवैध व्यवसायाला स्थनिक पोलिसांचा आशिर्वाद असल्याने या परीसरात गुन्हेगारीत वाढ झाली आहे.
जाहिरात-9423439946