जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

फुले यांचा पुरस्कार दिन “महात्मा दिन” साजरा करा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ११ मे १८८८ रोजी ज्योतीबा फुलेंना “महात्मा” ही पदवी प्रदान केली.त्या वेळे पासून देश त्यांना महात्मा म्हणून ओळखू लागला आहे.आता हा दिवस राज्य सरकारने “महात्मा दिन” साजरा करण्याची मागणी श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष सचिन गुलदगड यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

देशभरात वर्तमान काळात टाळेबंदी आदेश लागू असल्याने नागरिकांना तो साजरा करता येणार नाही त्यामुळे या वर्षी या दिनासाठी होणारा खर्च संपूर्ण देशावर आलेल्या ह्या कोरोना सारख्या महामारी विषाणू पासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या सोई सुविधा व समाजोपयोगी उपक्रमांसाठी खर्च करावा- सचिन गुलदगड

महात्मा फुले नावाने प्रसिद्ध असलेले जोतीराव ऊर्फ जोतीबा गोविंदराव फुले हे मराठी लेखक,विचारवंत आणि समाजसुधारक होते.त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली.शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली.

‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले. आजही (२०२० साली) त्यांची ही ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरते आहे. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.त्यांच्या कार्याला सलामी देण्यासाठी आता नागरिकांनी पुढे येऊन त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे.त्यासाठी आगामी ११ मे रोजी या मागणीसाठी सुरक्षित अंतर पाळत राज्यशासन,जिल्हाधिकारी,तहसीलदार,आदी पातळीवर निवेदने देऊन सरकारला हा महात्मा दिन साजरा करण्यासाठी दबाव तयार करावा लागेल.त्यांच्या कार्याला ती आदरांजली ठरेल असेही गुलदगड यांनी शेवटी म्हटलें आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close