जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ऑनलाइन तेरा हजारांवर डल्ला,खातेदारांत खळबळ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार व मोर्विस येथील रहिवाशी वाल्मिक नामदेव कोकाटे (वय-४५) हे कोपरगाव येथील बडोदा बँकचे खातेदार असून त्यांच्या खात्यावर पगाराची रक्कम नुकतीच जमा झालेली असताना त्यांच्या मुलाकडे आपला भ्रमणध्वनी असताना एका आरोपीने फोन करून त्याच्याकडून ओ.टी.पी.व आधार क्रमांक घेऊन त्या खात्यावरील १३ हजारांची रक्कम लंपास केली आहे.त्यामुळे बँक खातेधारकांत खळबळ उडाली आहे.

एका अनोळखी भ्रमणध्वनी क्रमांकावरून संपर्क साधून आपण बडोदा बँकेतून बोलत असून तुमचे खाते बंद पडले आहे.ते चालू करण्यासाठी तुम्ही तुमचा ओ.टि.पी.क्रमांक व आधार कार्ड क्रमांक द्या असे म्हणून त्याने तो घेतला व अवघ्या काही मिनिटात त्यांच्या खात्यातून पहिल्यांदा ९ हजार ९९९ तर दुसऱ्या वेळी २ हजार ८०० रुपये काढून घेतल्याचे संदेश कोकाटे यांच्या भ्रमणध्वनीवर प्राप्त झाल्यावर त्यांचे डोळे उघडले.

अलीकडे बँक खात्यातून रक्कम काढून जात असताना पिशवीतील रक्कम आपल्या दुचाकीवरून पळवून नेण्याची चोरट्यांनी पद्धत जुनी झाली असून चोरट्यानीं आता रक्कम पळविण्याचे नवीन तंत्रज्ञान अवगत केले आहे.विविध राष्ट्रीय व सहकारी बँका वारंवार आपल्या सभासदांना,ठेवीदारांना संदेश पाठवूनही नागरिक या सूचनांचे पालन करताना दिसत नाही.परिणामी त्यांना पच्छाताप करण्याची नामुष्की येत आहे.अशीच घटना नुकतीच दोन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील मोर्विस ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. या बाबत तक्रारदार वाल्मिक नामदेव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे खाते कोपरगाव येथील बडोदा बँकेत आहे.ते गुरुवार दि.३० एप्रिल रोजी दुपारी ४.३० वजेच्या सुमारास आपल्या गायींना पाणी पाजत असताना त्यांनी आपला भ्रमणध्वनी घरी ठेवला होता.नेमक्या त्याच वेळी त्यांना एक अनोळखी इसमाने फोन केला तो कोकाटे यांचा मुलगा साईप्रतिक कोकाटे याने तो उचलला.त्या आरोपीने ९१४४४५७००९ या भ्रमणध्वनी क्रमांकावरून संपर्क साधून आपण बडोदा बँकेतून बोलत असून तुमचे खाते बंद पडले आहे.ते चालू करण्यासाठी तुम्ही तुमचा ओ.टि.पी.क्रमांक व आधार कार्ड क्रमांक द्या असे म्हणून त्याने तो घेतला व अवघ्या काही मिनिटात त्यांच्या खात्यातून पहिल्यांदा ९ हजार ९९९ तर दुसऱ्या वेळी २ हजार ८०० रुपये काढून घेतल्याचे संदेश कोकाटे यांच्या भ्रमणध्वनीवर प्राप्त झाल्यावर त्यांचे डोळे उघडले. त्यानी तातडीने आज बडोदा बँकेच्या कोपरगाव शाखेत संपर्क साधून ते खाते बंद केले आहे.व शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र हि बाब सायबर गुन्हा असल्याने तुम्हाला ती तक्रार नगर येथे दाखल करावी लागेल असा सल्ला देण्यात आला आहे मात्र कोरोना साथीमुळे टाळेबंदी असल्याने दळण वळण यंत्रणा बंद असल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.त्यानी अखेर सगळीकडे कार्यकर्ते,त्यांचे नेते यांच्याकडे धाव घेऊनही उपयोग न झाल्याने अखेर आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून आपली व्यथा सांगून टाकली आहे. व या प्रकरणाला वाचा फोडण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close