कोपरगाव तालुका
..या गावात तहसिल पथकाने केली तंबाखुजन्य पदार्थांची होळी
संपादक-नानासाहेब जवरे
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मौजे कुंभारी येथे कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी श्री जेडगुले, गावतलाठी एस.एम.साबने, कुंभारीचे पोलीस पाटील उल्हास मेढे तसेच पथकातील इतर कर्मचाऱ्यांसह पोलिस पथकाने शासनाने ठरवुन दिलेल्या सकाळी १० ते ४ या वेळेत सुरू असलेल्या दुकानांची तपासणी करून दुकानदाराकडे आढळलेल्या घुटका,विडी,सिगारेट व तत्सम तंबाखुजन्य पदार्थ जप्त करून त्यांची होळी करण्यात आली आहे. त्यामुळे या अवैध अवैध विक्री करणाऱ्या दुकानदारामध्ये खळबळ उडाली आहे.
राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटख्यावर बंदी घातली होती. त्यानंतरही युवापिढी तंबाखूजन्य उत्पादनात गुटख्याचा वापर करीत आहेत. मात्र बंदी येण्यापूर्वीच गुटखा निर्मात्यांनी पान मसाला बनवणे सुरु केले. आणि तरुणपिढी पान मसाल्यासह तंबाखू खाऊ लागली. बंदीपूर्वीपेक्षाही बंदीनंतर गुटख्याची निर्मिती व विक्री पूर्वीपेक्षा वाढली आहे.
राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटख्यावर बंदी घातली होती. त्यानंतरही युवापिढी तंबाखूजन्य उत्पादनात गुटख्याचा वापर करीत आहेत. मात्र बंदी येण्यापूर्वीच गुटखा निर्मात्यांनी पान मसाला बनवणे सुरु केले. आणि तरुणपिढी पान मसाल्यासह तंबाखू खाऊ लागली. बंदीपूर्वीपेक्षाही बंदीनंतर गुटख्याची निर्मिती व विक्री पूर्वीपेक्षा वाढली आहे. महाराष्ट्रात गुटखा उत्पादन बंद असले तरी पानमसाला व तंबाखू असे दोन वेगवेगळे पाऊच (पुड्या) बनविले जातात.यातून तरुण पिढी बरबाद होत आहे.कुंभारीतही हाच प्रकार आढळला आहे.
गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदारांनीं पुन्हा अशी चुक करू नये आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी तंबी देउन सोडुन देण्यात आले अशी माहीती गावचे पोलिस पाटील उल्हास मेढे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजने अंतर्गत राज्यातील सर्व दुकानदारांना तंबाखुजन्य पदार्थ विक्री न करण्याच्या सुचना या अगोदर केलेल्या असुन कोपरगाव तालुक्यात या सुचनांची अंमलबजावणी कशी होते हे तपासण्यासाठी कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नेमले असुन तालुक्यातील प्रत्येका गावात जाउन सर्व दुकानांची तपासणी केली जात आहे तरी येथुन पुढे सर्व दुकानदारी खबदारी घेउन शासनास सहकार्य करण्याची विनंती पोलिस पाटील मेढे यांनी केली आहे.