नगर जिल्हा
बोकटे यात्रा फक्त नाममात्र साजरी
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर-(वार्ताहर)
येवला तालुक्यातील बोकटे ग्रामपंचायत हद्दीत जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या श्री काल भैरवाची यात्रा अत्यंत सध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने टाळेबंदी जाहीर केलेली असल्याने भाविकांनी गर्दी करू नये व घरीच थांबावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले यांनी केले होते.
श्री क्षेत्र बोकटे येथे यात्रेची शेकडों वर्षांपासून परंपरा चालत आलेली आहे. सालाबादाप्रमाणे भरणाऱ्या या भगवान श्री काल भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या कालाष्टमीच्या यात्रे निमित्त नाशिक, नगर, संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील लाखो भाविक येत असतात.मात्र यावेळी कोरोनामुळे हि यात्रा ग्रामस्थांनी प्रशासनाच्या आवाहनाला साथ देत बंद ठेवण्यात आली होती.
श्री क्षेत्र बोकटे येथे यात्रेची शेकडों वर्षांपासून परंपरा चालत आलेली आहे. सालाबादाप्रमाणे भरणाऱ्या या भगवान श्री काल भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या कालाष्टमीच्या यात्रे निमित्त नाशिक, नगर, संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील लाखो भाविक येत असतात. भगवान श्री काल भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र बोकटे पुण्यनगरीतील मंदिरात आज कालाष्टमी निमित्ताने भरणाऱ्या यात्रेला भाविक,भक्तांनी मंदिर व परिसरात गर्दी न करता आपल्या घरीच गोड पदार्थ तयार करून गुढ्या उभाराव्या,आपल्या घरातील श्री काल भैरवनाथांच्या फोटोलाच नैवद्य दाखवुन,पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करावे.असे आवाहन तालुका प्रशासन व जिल्हा परिषद महेंद्र काले,सीताराम दाभाडे,व नजीकच्या नागरिकांनी केले होते.
येवला ग्रामिण पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी सकाळी बोकटे येथे येऊन मंदिराची पहाणी केली व मंदिर परिसरात एक पोलीस पथक तैनात केले. त्यात सहाय्यक फौजदार तांदलकर, पो. हवालदार पगार,निकम,हेंबाडे,पारधे आदी पोलिस कर्मचारी गावाच्या आरोग्याच्या, जनतेच्या हितासाठी मंदिर परिसरात तैनात केलेले होते.या आवाहनाला भाविकांनी साथ दिल्याबद्दल जिल्हा परिषद महेंद्र काले यांचेसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.