जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

चार खेळाडूंची महाराष्ट्राच्या हॉकी संघात निवड

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   अहिल्यानगर जिल्ह्यातील गौतमनगर येथे दि.६ ते ७  रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघ या स्पर्धेचा विजेता संघ ठरला असून गौतम पब्लिक स्कूलच्या प्रणव लोंढे (गोलकीपर),श्रेयस गाडेकर,कृष्णा सातपुते व रणवीरसिंग नागलोट चार खेळाडूंची महाराष्ट्राच्या हॉकी संघात निवड झाली आहे.विजेत्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक,मुंबई,पुणे,नागपूर,लातूर,संभाजीनगर,कोल्हापूर व अमरावती अशा आठ विभागातील मुला-मुलींचे एकूण १६ संघ सहभागी झाले.उपांत्य फेरीतील  सामना गौतम पब्लिक स्कूल (पुणे विभाग) व मुंबई विभाग (डॉन बॉस्को स्कूल) या दोन्ही संघांमध्ये खेळला गेला होता.त्यात हा विजय संपादन केला आहे.

    अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व गौतमनगर येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ ते ७ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या त्यावेळी ही निवड झाली आहे.

  या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक,मुंबई,पुणे,नागपूर,लातूर,संभाजीनगर,कोल्हापूर व अमरावती अशा आठ विभागातील मुला-मुलींचे एकूण १६ संघ सहभागी झाले.उपांत्य फेरीतील  सामना गौतम पब्लिक स्कूल (पुणे विभाग) व मुंबई विभाग (डॉन बॉस्को स्कूल) या दोन्ही संघांमध्ये खेळला गेला.या सामन्यात  गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने शेवटपर्यंत सामन्यावर वर्चस्व ठेवून हा सामना ३-० असा एकतर्फी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.स्पर्धेचा अंतिम सामना पुणे विभाग (गौतम पब्लिक स्कूल,अहिल्यानगर);व कोल्हापूर विभाग (डी.सी.नरके विद्यालय, कुडीत्रे) यांच्या दरम्यान झाला.हा सामना अतिशय रोमहर्षक व अटीतटीचा झाला. दोन्ही संघाचे समसमान तीन गोल झाले असतांना शेवटपर्यंत कोणता संघ विजयश्री प्राप्त करील याची शाश्वती नव्हती.अशा वेळी पुणे विभागाने (गौतम पब्लिक स्कूल,अहिल्यानगर)च्या संघाने लक्षवेधी खेळ करत कोल्हापूर विभागाचा पेनल्टी स्ट्रोक मध्ये चौथा गोल करून ४-३ अशा गोल फरकाने पराभव करून राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात सलामी दिली आहे.

   दरम्यान निवड समितीने निवडलेला महाराष्ट्र हॉकी संघ (वयोगट १४ वर्ष मुले) पुढीलप्रमाणे असून यामध्ये प्रणव सतीश लोंढे (गोलकीपर,अहिल्यानगर),प्रसाद प्रशांत पाटील (गोलकीपर,नाशिक),आलोक अरविंद जाधव (सांगली),श्रेयस शंकर मलाई (कोल्हापूर),श्रेयस दीपक गाडेकर (अहिल्यानगर),अर्णव संदीप भांड (नाशिक),कृष्णा गणेश सातपुते (अहिल्यानगर),प्रवीण हिंदुराव पाटील (कोल्हापूर),क्लाईड मेंडोंसा (मुंबई),जगजीत सेवा सिंग (नांदेड),अनुप नयन पाटील (कोल्हापूर),रायजिंग रिचर्ड डेव्हिड (मुंबई),मयूर विष्णू मडावी (अमरावती),ऋत्विक वैभव चव्हाण (संभाजीनगर),रणवीरसिंग चरणसिंग नागलोट (अहिल्यानगर),पियुष भुमेश्वर मडावी (नागपूर),स्लाईड जॉन्सन अँड्र्यूज (पूणे), राजवीर रणजीत पाटील (कोल्हापूर) आदींचा समावेश आहे.

   तर मुलींचा महाराष्ट्र हॉकी संघ (वयोगट १४ वर्ष) पुढीलप्रमाणे यामध्ये आराध्या तुषार चोरमले (गोलकीपर,सातारा),संस्कृती पंकज शेटे (गोलकीपर,अहिल्यानगर),श्रावणी सतीश जाधव (सातारा),आर्या अजित महागडे (सातारा),क्रितिका सदबीरा सिंग (मुंबई), दूर्वा रामचंद्र साळुंखे (सातारा),उन्नती रवींद्र गुबे (नागपूर),जानवी बाजीराव वाघमोडे (अहिल्यानगर),विनिता गिरीश वसावे (नाशिक),खुशी सुखलाल पावरा (नाशिक),अलिझा फिरोज पठाण (पुणे),अनघा भरत केंजळे (सातारा),सांची संदेश सरोडकर (संभाजीनगर),वृषाली आदिनाथ रेवांना (सांगली),चैतन्या आनंद कलसे (लातूर),अक्षया निलेश भारसाकळे (अमरावती),निहारिका विजय लोखंडे (कोल्हापूर),श्रद्धा पांडुरंग लबडे (अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.

   दरम्यान मुलांच्या शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धा दिनांक २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मध्यप्रदेशातील टीकमगढ येथे तर मुलींच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धा जानेवारी महिन्यात मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे होणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.दरम्यान या यशस्वी संघाचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे,सर्व संचालक,संस्था निरीक्षक नारायण बारे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close