कोपरगाव तालुका
..या नेत्यांनी केली साठवण तलावाच्या कामाची पाहणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
एक महिन्यापासून देश,व राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे.एकवीस दिवसाची टाळेबंदी संपून पुढे ३ मे पर्यंत ती वाढविण्यात आली आहे.यावर्षी हवामान खात्याकडून मान्सून वेळेत दाखल होण्याचे संकेत दिले आहे.त्या पार्श्वभूमीवर ५ नंबर साठवण तलावाचे खोदाई काम पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.
मागील एक महिन्यापासून देश,व राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे.एकवीस दिवसाची टाळेबंदी संपून पुढे ३ मे पर्यंत ती वाढविण्यात आली आहे.यावर्षी हवामान खात्याकडून मान्सून वेळेत दाखल होण्याचे संकेत दिले आहे.त्या पार्श्वभूमीवर ५ नंबर साठवण तलावाचे खोदाई काम पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी आ.काळे नियमितपणे ५ नंबर साठवण तलावाच्या खोदाई कामाची माहिती घेत होते.नागरिकांचे आरोग्य अबाधित राहिले पाहिजे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटला पाहिजे.कोपरगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधक सर्व प्रकारच्या उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. उन्हाळ्याची परिस्थिती आहे खोदाई काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे हे मोठे आव्हान आहे.अशा परिस्थितीत त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी व गायत्री कन्स्ट्रक्शनचे कर्मचाऱ्यांसोबत ५ नंबर साठवण तलावाच्या खोदाई कामाची पाहणी करून माहिती घेतली आहे.कोरोनाच्या जागतिक संकटात देखील ५ क्रमांकाच्या साठवण तलावाचे खोदाई काम अविरतपणे सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
सदर प्रसंगी गायत्री कन्स्ट्रक्शनचे सोमेश वैद्य व नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याशी चर्चा करून पावसाळ्याच्या आत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. खोदाई कामात अडचणी आल्यास तात्काळ कळवा तुमच्या अडचणी लगेच सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.