गुन्हे विषयक
न्यायालयात साक्ष दिल्यावरून एकास मारहाणी सह,कोपरगावात दोन गुन्हे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला फिर्यादी इसम विकास साहेबराव लोंढे (वय-२५) यांनी पंचनाम्यावर सही करून न्यायालयात साक्ष दिल्याचा राग मनात धरून आरोपी मंगेश संतोष मोरे,सुयोग वसंत मोरे,काका कोंडीराम कदम सर्व रा.रवंदे आदींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन त्यास काठी,विटाने,लाथा बुक्यांनी मारहाण करून वाईट वाईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे रवंदे आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
वर्तमानात सामान्य माणसांची सहनशीलता संपली काय असे म्हणायला जागा निर्माण झाली असून किरकोळ कारणावरून माणसे एकमेकास मारहाण करून जीवे मारण्याची धमक्या देत असल्याचे उघड झाले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील रवंदे शिवारात घडली असून फिर्यादी विकास साहेबराव लोंढे हे केटरिंगचा व्यवसाय करत असून आपल्या कुटुंबात अन्य सदस्यांसोबत राहतात.त्यांनी आरोपी संबंधित एका प्रकरणात न्यायालयात साक्ष दिली होती.त्याचा मनात राग धरून त्याच गावातील आरोपी मंगेश मोरे,सुयोग मोरे,काका कदम आदींनी त्यांना दि.१५ जानेवारी रोजी दुपारी ०३ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांना शिवीगाळ करून पंचनाम्यावर सही करून न्यायालयात साक्ष दिल्याच्या कारणावरून फिर्यादिस काठीने,विटाने व लाथा बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,पो.हे.कॉ.बोटे यांनी भेट दिली आहे.यांचे मार्गदर्सनाखाली पोलीस हे.कॉ.सुरेश बोटे हे करत आहेत.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.क्रं.३२/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मर्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सुरेश बोटे हे करत आहेत.
दिव्यांग व्यक्तीस मारहाण,गुन्हा दाखल
दरम्यान दुसऱ्या एका गुन्ह्यात दिव्यांग असलेला आपेगाव येथील फिर्यादी शरद पोपट खिलारी यांने दि.११ जानेवारी रोजी सकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास आपण आपल्या घरासमोर येऊन सरपण उचलत असताना त्याच गावातील आरोपी साहेबराव बारकू खिलारी,रावसाहेब बारकू खिलारी आदींनी आपल्या आजोबास शिवीगाळ करून दमदाटी करून फिर्यादीला,”तुम्ही मागे आमची वाळू चोरली,आमचा आकडा पकडून दिला” असा आरोप करून रावसाहेब बारकू खिलारी याने शेऱ्या,आंधळ्या,ढापण्या,बांग्या असे म्हणून अपमानित केले आहे.तर समाधान रावसाहेब खिलारी,अमोल रावसाहेब खिलारी,मीराबाई साहेबराव खिलारी आदींनी आम्हाला हाताने चापट मारून आजोबाला खाली पाडून शिवीगाळ करून दमदाटी केल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा क्रं.३१/२०२३ अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम कलम ९२,भा.द.वि.कलम ३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९,अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश आव्हाड हे करीत आहे.