गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यातून महिला गायब,पोलिसांत नोंद दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथून सुवर्णा अमोल सोनवणे हि महिला काल पहाटे ०२ वाजेच्या सुमारास कोणालाही काही एक न सांगता घरातून निघून गेली आहे.याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गायब नोंदणी पुस्तकात नोंदणी केली असून सदर महिला अद्याप सापडली नसल्याची माहिती तिंचा कोपरगाव साईसीटी येथील रहिवासी असलेला भाऊ विजय आहेर यांनी दिली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील महिलामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गायब महिलेचे छायाचित्र.
दरम्यान सदर महिला कोणाला आढळल्यास पुढील मोबाईल क्रमांकावर ९६३७०५३०३०,९६९६३८३०३० वर संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव साई सिटी येथील गायब महिलेचा भाऊ विजय आहेर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.
राज्यात मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.त्यामुळे त्यांचे पालक चिंतेत असून या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.कोपरगाव तालुका आणि शहरही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहारातींल महिला आणि महाविद्यालयीन मुलीही लक्षणीयरीत्या गायब होत असल्याने पालकांच्या चिंतेत वाढ होणे स्वाभाविक मानले पाहिजे.त्यातच मुलगी उपवर असेल तर हि चिंता आणखी वाढते.कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव पी.जे.एस.एस.शाळेजवळ रहिवासी असलेली विवाहित महिला अंदाजे (वय-३५) घरात कोणालाही काही एक न सांगता काल पहाटे ०२ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेली आहे.त्यामुळे घरातील पती,दोन मुले व अन्य नातेवाईक चिंतेत आहेत.
दरम्यान सदर महिला कोणाला आढळल्यास पुढील मोबाईल क्रमांकावर ९६३७०५३०३०,९६९६३८३०३० वर संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव साई सिटी येथील गायब महिलेचा भाऊ विजय आहेर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.
सदर महिला गायब झाल्याने तिचे नातेवाईक सैरभैर झाले आहे.त्यांनी या महिलेचा आपल्या नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही त्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी हरविल्याच्या दप्तरात या घटनेची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.टी.चव्हाण हे करीत आहेत.