जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

चांदेकसारेत…हा गट ठरणार निर्णायक !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

चांदेकसारे-(किसन पवार)

कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी चांदेकसारे ग्रामपंचायतीचा निवडणूक प्रचार अंतिम टप्यात पोहोचला आहे.जवळपास ५ हजार च्या पुढे लोकसंख्या असलेल्या ह्या गावात ३ हजार ६०६ एकूण मतदार आहेत आणि १३ सदस्य व एक लोकनियुक्त सरपंच असे १४ सदस्य संख्या आहे.दरम्यान यान निवडणुकीत सरपंच निवड थेट जनतेमधून होत असल्याने काळे व कोल्हे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.मात्र यात परजणे गटाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा असून अपक्ष सरपंच यांनी दोन्ही गटाच्या नाकात दम आणला असल्याचे चित्र आहे.

दरम्यान येथील तीन नंबरचा महत्त्वाची भूमिका असणारा नामदेवराव परजणे यांचा गट हा मोठा जनाधार असलेला गट असून या गटाने नेहमीच महत्त्वाची भूमिका पार पाडून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.गोदावरी खोरे दूध संघाचे माजी उपाध्यक्ष सुभाष होन हे या गटाचे नेतृत्व करत आहेत.त्यांनी मात्र या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केलेले नाही.मात्र ‘किंग मेकर’च्या भूमिकेत हा गट असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे त्यांच्याकडे राजकीय नरीरिक्षकांचे लक्ष लागून आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी संबंधित ठिकाणी प्रचार अंतिम टप्यात आला असून किंबहुना आज प्रचार संपला आहे.असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यामुळे ऐन हिवाळ्यात व रब्बी हंगामात कार्यकर्ते कामाला लागले होते.त्यात कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसह ग्रामीण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले होते आता दि.१८ डिसेंबर रोजी काय होणार याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.त्यातील शिंगणापूर,चांदेकसारे,सुरेगाव,माहेगाव देशमुख आदी निवडणुकात प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या.

दरम्यान येथील तीन नंबरचा महत्त्वाची भूमिका असणारा नामदेवराव परजणे यांचा गट हा मोठा जनाधार असलेला गट असून या गटाने नेहमीच महत्त्वाची भूमिका पार पाडून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.गोदावरी खोरे दूध संघाचे माजी उपाध्यक्ष सुभाष होन हे या गटाचे नेतृत्व करत आहेत.त्यांनी मात्र या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केलेले नाही.मात्र किंग मेकरच्या भूमिकेत हा गट असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या गटाच्या भूमिकेकडे प्रस्थापितांचे लक्ष लागले आहे कारणही तसेच आहे कारण संबंधित गटाची ज्या गटा सोबत युती किंवा मदत असेल त्याच्याकडेच ग्रामपंचायतची सत्ता राहीली‌ आहे असा आजवरचा इतिहास आहे आणि तसें प्रश्न काळे कोल्हे गटाच्या गाव पातळीवरील पार्टी प्रमुखांना विचारण्यात आला आहे.त्यामुळे दोन्हीही गट परजणे गटाबरोबर कोणत्याही परिस्थितीत युती करायला इच्छूक होते परंतु परजणे गटाने सत्तेत सहभागी होण्यासाठी नकार दिला आहे.कुणाला मदत करून सत्ता द्यायची याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे असे सुभाषराव होन यांनी सांगितले.

गत ग्रामपंचायत निवडणुकीत परजणे गटाने कोल्हे गटाला पाठींबा देऊन मदत केल्यामुळेच सत्ता मिळवून दिली होती परंतु परजणे गटाला विश्वासात न घेता सन्मानाची वागणूक न देता कोणतेही विकासाची भरीव कामे केली गेली नाहीत.याशिवाय (त्यांच्या लौकिकाप्रमाणे) दिलेले शब्द पाळले गेले नाही.म्हणून परजणे विखे गट विचार पुर्वक निर्णय घेणार असल्याचे उघड आहे.आणि लवकरच कार्यकर्त्यांंशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार आहेत अशी माहिती होन यांनी दिली आहे.मात्र ते कोणती भूमिका घेणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतीषाची गरज नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close