जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अयशस्वी चोरीचा प्रयत्न,शिर्डीत गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येस साधारण बावीस कि.मी.अंतरावर असलेल्या व शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेले वकील योगेश साहेबराव खालकर यांच्या वस्तीवर काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञातच तीन चोरट्यानी घरी कोणी नसताना घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना फिर्यादीच्या भावाने सावधगिरी बाळगल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे.या प्रकरणी फिर्यादीनीं शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दखल केला आहे.

रांजणगाव देशमुख शिवारात काल सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी कोणी नव्हते या संधीचा फायदा घेऊन चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करून ऐवज लुटीच्या प्रयत्नात असताना फिर्यादी यांचे चुलत भाऊ प्रतीक खालकर हे संशय आल्याने घटनास्थळी आले व त्यांना घराला आतून कडी लावलेली आढळली होती.त्यामुळे त्यांनी खात्री करण्यासाठी त्यांनी घराची कडी वाजवली असता तीन चोरट्यानी घराच्या छतावरून धूम ठोकली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हे कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील रहिवासी असून त्यांचा कोपरगाव येथील न्यायालयात वकिलीचा व्यवसाय आहे.सुट्टीच्या दिवशी ते आपल्या शेतात जात असतात.शुक्रवार दि.०९ रोजी न्यायालयास सुट्टी असल्याने ते आपले रब्बी पिके उभारण्याचे काम सुरू असल्याने शेतावर गेलेले होते.सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी कोणी नव्हते या संधीचा फायदा घेऊन चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करून घरातील ऐवज लुटीच्या प्रयत्नात असताना शेजारी असलेले फिर्यादी यांचे चुलत भाऊ प्रतीक खालकर हे संशय आल्याने घटनास्थळी आले व त्यांना घराला आतून कडी लावलेली आढळली होती.त्यामुळे त्यांनी खात्री करण्यासाठी त्यांनी घराची कडी वाजवली असता तीन चोरट्यानी घराच्या छतावरून धूम ठोकली आहे.

फिर्यादी यांनी घरात घुसून खात्री केली असता घरातील चीजवस्तू गेल्या नाही मात्र घराचे कुलूप तोडलेला आढळेल आहे.व बेडरूम आणि बाथरूमचा दरवाजा तोडलेला आढळून आलेला आहे.त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.त्या ठिकाणी आल्यावर त्यांनी खात्री झाल्यावर या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यास याची खबर दिली आहे.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक माळी यांनी दिली आहे.

शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.क्रं.५९७/२०२२ भा.द.वि.कलम ३८०,५११,४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक गुलाब पाटील यांचे मार्गदशनाखाली पोलीस हे.कॉ.वेताळ हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close