जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अखेर गैरव्यवहारातील ‘तो’ ग्रामसेवक जेरबंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायत मध्ये काम करणारे ग्रामसेवक शिवाजी भाऊसाहेब मगर,सरपंच रेणुका दत्तू दरेकर व ठेकेदार बाबासाहेब रामभाऊ शिंदे या तिघांनी संगनमताने २०२० ते २०२२ या काळात कुठल्याही प्रकारचे गावात विकासाचे काम न करता धनादेशाद्वारे २५ लाख ९५ हजार ९५० रुपयाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी आज संबंधित ग्रामसेवकास नुकतीच अटक केली असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे.त्यास कोपरगाव पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

या प्रकरणी फरार असलेला आरोपी शिवाजी मगर शिर्डी पोलिसांना सदर इसम हातावर तुरी देऊन अनेक महिने फरार झाला होता.त्याचा शोध घेऊनही त्याचा तपास लागत नव्हता मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून तो गेल्या वीस दिवसापासून गजाआड केला आहे.या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही मात्र आमच्या प्रतिनिधीस मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चौकशी केली असता पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र त्यास दुजोरा दिला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”धोंडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये शिवाजी भाऊसाहेब मगर हे मूळ संवत्सर येथील रहिवासी असलेले इसम ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते.सदर इसम हे सतत आपल्या कामावर गैरहजर असल्याने नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या.आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी भेट देऊन विस्तार अधिकारी वाघमोडे यांनी त्यास नोटीस बजावली होती.त्यास नोटीस बजावूनही त्याने आपल्या ग्रामपंचायतीचे दप्तर पंचायत समितीत जमा केले नव्हते.दि.६ मे २०२२ रोजी नवीन ग्रामसेवकांना पदभार द्यावा असा आदेश बजावले होते.तरीही संबंधित मुजोर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने आपला पदभार नवीन ग्रामसेवकाकडॆ सोपवला नव्हता.
दरम्यान सदर ठिकाणी कोपरगाव पंचायतीचे गटविकास अधिकारी यांनी पंच समक्ष तपासणी केली असता १४ व्या वित्त आयोगातून असलेल्या बँक खात्यातून १४ आक्टोंबर २०२१ ते ०४ फेब्रुवारी २०२२ या कालखंडात १५ लाख ३५ हजार ७५० इतका खर्च केला असल्याचे उघड झाले आहे.मात्र त्यासंबंधी कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल केली नव्हती.म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय वाढला होता.त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आपले चौकशी पथक पाठवून कामकाजाचे परिक्षण असता हा आर्थिक गैरकारभार उघड केला होता.

यात संशयित ग्रामसेवकाने १५ वित्त खात्यातून १५ फेब्रुवारी ते ०६ एप्रिल २२ या काळात १० लाख ६० हजार २०० रुपये इतका खर्च केला होता.पण कोणत्या कामावर झाला हे निदर्शनास येत येत नव्हते.दरम्यान धोंडेवाडी ग्रामपंचायतीत कोणतेही काम केल्याचे आढळून आले नव्हते.
ग्रामसेवक शिवाजी मगर,सरपंच रेणुका दरेकर यांनी काम न करता जवळपास २५ लाख ९५ हजार ९५० इतकी मोठी रक्कम बँक खात्यातून बाबासाहेब शिंदे यांच्या नावाने वेळोवेळी धनादेशद्वारे काढली असल्याचे उघड झाले होते.
कोपरगाव पंचायत समितीचे गट विस्ताराधिकारी बबन भाऊराव वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी धोंडेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवाजी भाऊसाहेब मगर रा.संवत्सर.कोपरगाव धोंडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रेणुका दरेकर व बाबासाहेब शिंदे रा.शिर्डी या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद क्रं.०२७२/२०२२ भा.द.वि.कलम ३४,४०९,४२० अन्वये गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी फरार असलेला आरोपी शिवाजी मगर शिर्डी पोलिसांना सदर इसम हातावर तुरी देऊन अनेक महिने फरार झाला होता.त्याचा शोध घेऊनही त्याचा तपास लागत नव्हता मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून तो गेल्या वीस दिवसापासून गजाआड केला आहे.या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही मात्र आमच्या प्रतिनिधीस मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चौकशी केली असता पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्यास दुजोरा दिला आहे.त्यास अजून जामीन मिळालेला नाही अशी माहिती समजत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close