गुन्हे विषयक
दुचाकीच्या डिकीतून मोठी चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीत पुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी फिर्यादी लघुशंकेसाठी थांबले असता त्यांच्या दुचाकीच्या डिकीत ठेवलेली व्यापाऱ्यांच्या वसुलीची ९० हजारांची रक्कम अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून लंपास केली असल्याची फिर्याद दिनेश अशोक शिंदे (वय-३३) रा.दहिवेल ता.साक्री जि.धुळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादीने आपल्या ताब्यातील रक्कम आपल्या ताब्यातील बजाज पल्सर या दुचाकीच्या (क्रं.एम.एच.१५ एच.डब्ल्यू.१५७०) या डिकीत ठेवली होते.मात्र काही वेळ त्यांच्या गाडीकडे आपल्या कामामुळे दुर्लक्ष झाले या संधीचा गैरफायदा उठवत अज्ञातच चोरट्याने त्यांच्या डिकीतील ५००,२००,१००,५९,२०,१० दराच्या नोटा एकूण ९० हजार रुपयांवर डल्ला मारला आहे.हि बाबत त्यांच्या उशिरा लक्षात आली असता त्यांनी आजूबाजूस सदर चोरट्याला शोधून पहिले मात्र तो आढळला नाही.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहीवेल येथील रहिवासी असून ते श्रीरामपूर तालुक्यातील श्री गणेश एंटरप्रायझेस या कंपनीत नोकरी करत आहे.सदर कंपनी हि स्टीलचे भांडे व प्लस्टिकच्या खुर्च्या विक्रीचे काम करते.व आपण सदर विक्री केलेल्या मालाची वसुली करत आहे.वर्तमानात ते श्रीरामपूर येथील प्रभाग क्रमांक सात मध्ये रहिवासी आहेत.आपण विक्रि केलेल्या मालाची वसुली करण्यासाठी आपण सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात आलो होतो.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे,पोहेगाव,घारी आदी ग्रामपंचायत हद्दीत विक्री केलेल्या मालाची वसुली करत असताना व्यापाऱ्यांकडून वसूल झालेली ९० हजारांची रक्कम आपल्या ताब्यातील बजाज पल्सर या दुचाकीच्या (क्रं.एम.एच.१५ एच.डब्ल्यू.१५७०) या डिकीत ठेवली होती मात्र आपल्याला लघुशंका आल्याने आपली गाडी चांदेकसारे हद्दीत सुरु असलेल्या पुलाच्या कामाजवळ उभी करून आपण लघुशंका केली व पुन्हा एकदा गाडीकडे वळलो असता होते.मात्र काही वेळ आपले गाडीकडे दुर्लक्ष झाले या संधीचा गैरफायदा उठवत अज्ञात चोरट्याने त्यांच्या डिकीतील ५००,२००,१००,५९,२०,१० दराच्या नोटा एकूण ९० हजार रुपयांवर डल्ला मारला आहे.हि बाब लघु शंका झाल्यावर आपल्या उशिरा लक्षात आली असता त्यांनी आजूबाजूस सदर चोरट्याला शोधून पहिले मात्र तो आढळला नाही.अखेर कंटाळून त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली असून त्या ठिकाणी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सुरेश धाकराव,सहाय्यक फौजदार अशोक गवसने यांनी भेट दिली असून घटनेचे गांभीर्य समजावून घेतले आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३९०/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गवसने हे करीत आहेत.