सामाजिक उपक्रम
गुरू शुक्राचार्य मंदिरास…यांचेकडून वातानुकूलित सयंत्र भेट

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री क्षेत्र कोपरगाव बेट येथील दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिरात उष्ण व दमट वातावरणातून भक्तांची सुटका करण्यासाठी नुकतेच येथील आयुर्वेदीक तज्ज्ञ व राष्ट्रीय गुरु डॉ.रामदास आव्हाड यांनी वातानुकूलित सयंत्र (ए.सी.) भेट दिले आहे.त्यामुळे विश्वस्तांसह भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.
श्री क्षेत्र कोपरगाव बेट या ठिकाणी दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर आहे.सदर मंदिर प्राचीन असून त्या ठिकाणी मंदिरात एकच प्रवेशद्वार आहे.त्यामुळे हवेचे प्रमाण अत्यल्प असते.त्यामुळे दर्शनार्थी भक्तांना पूजा विधी करण्यात प्रतिकूल वातावरण निर्माण होत होते.त्या ठिकाणी अस्तित्वात असलेला सभामंडपाच्या ठिकाणी गर्दीत मोठे उष्ण वातावरण निर्माण होत होते.त्यासाठी वातानुकूलित यंत्र बसविणे गरजेचे असताना त्यासाठी ‘दाता’ मिळत नव्हता ती उणीव डॉ.रामदास आव्हाड यांनी भरून काढली आहे.
कोपरगाव शहराच्या आग्न्येय दिशेस हाकेच्या अंतरावर देवगुरु ब्रहस्पती व दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षेत्र कोपरगाव बेट हे पावन क्षेत्र आहे.त्याच ठिकाणी समुद्र मंथनातून मिळालेले रत्न वाटपावरून देव-दानव युद्ध झाले होते.या युद्धात दानवांना जिवंत करण्यात अहंम भूमिका निभणारी शुक्राचार्यांची ‘संजीवनी विद्या’ बहराला आली होती.या ठिकाणी ऐत्याहसिक ब्रहस्पती पुत्र कच व शुक्राचार्य कन्या देवयानी यांची प्रेम कथा फुलली होती.या ठिकाणीच संजीवनी विद्या शुक्राचार्यांकडून कचाने पळवली होती.त्या ठिकाणी अद्यापही संजीवनी विद्या दिलेला संजीवनी पार अस्तित्वात आहे.याच ठीकाणी शुक्राचार्य मंदिर आहे.त्या ठिकाणी राज्यातून व परप्रांतातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.
सदर मंदिर प्राचीन असून त्या ठिकाणी मंदिरात एकच प्रवेशद्वार आहे.त्यामुळे हवेचे प्रमाण अत्यल्प असते.त्यामुळे दर्शनार्थी भक्तांना पूजा विधी करण्यात प्रतिकूल वातावरण निर्माण होत होते.त्या ठिकाणी अस्तित्वात असलेला सभामंडपाच्या ठिकाणी गर्दीत मोठे उष्ण प्रतिकूल वातावरण निर्माण होत असते.त्यासाठी वातानुकूलित यंत्र बसविणे गरजेचे असताना त्यासाठी ‘दाता’ मिळत नव्हता.मात्र वर्तमानात श्रावण महिना असून या ठिकाणी भाविकांचा मोठा राबता असतो.वर्तमानात कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ.रामदास आव्हाड हे डॉ.अंजली आव्हाड यांचेसह सपत्नीक पूजाविधी करण्यासाठी आले होते.शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने त्यांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आला होता.त्या वेळी त्यांना त्या ठिकाणी त्रासदायक उष्ण व दमट वातावरणाची जाणीव झाली व त्यांनी त्या ठीकाणी व्यवस्थापन मंडळाशी चर्चा करून या बाबत आपली मनोकामना त्यांना सांगून त्या ठिकाणी वातानुकूलित सयंत्र बसविण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यांनी नेमकी गरज ओळखून त्याची इच्छा प्रकट केल्याने उपस्थित विश्वस्त मंडळाने समाधान व्यक्त केले आहे.तेवढ्यावर ते थांबले नाही आपला विचार थेट अंमलबजावणीत परावर्तित केला आहे.या उपक्रमाबद्दल मंदिर प्रशासनाने त्यांचा सत्कार केला आहे.व उभय दांपत्याचे आभार व्यक्त केले आहे.
सदर प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,मंदिर प्रमुख सचिन परदेशी,मंदिर उप-प्रमुख प्रसाद पऱ्हे,आदिनाथ ढाकणे,मधुकर साखरे,दिलीप सांगळे,दत्तात्रय सावंत,संजय वडांगळें,बाळासाहेब लकारे,मुन्ना आव्हाड,भागचंद रुईकर,कालिदास आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते .
या प्रसंगी डॉ.आव्हाड दांपत्याच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आला आहे .