जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

राज्‍यस्‍तरीय रस्‍सीखेच स्‍पर्धेत…या संकुलाची लक्षवेधी कामगिरी

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या नविन शैक्षणिक संकुलातील मैदानावर अ.नगर जिल्‍हा रस्‍सीखेच संघटना व महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍सीखेच संघटनेच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि.१५ ऑगस्‍ट ते १७ ऑगस्‍ट या कालावधीत राज्‍यस्‍तरीय रस्‍सीखेच स्‍पर्धा संपन्‍न झाल्‍या असून श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्‍या विद्यार्थ्‍यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.

अ.नगर जिल्‍हा रस्‍सीखेच संघटना व महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍सीखेच संघटनेच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १५ ऑगस्‍ट ते १७ ऑगस्‍ट या कालावधीत राज्‍यस्‍तरीय रस्‍सीखेच स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते.या स्‍पर्धेत महाराष्‍ट्रातील २५ जिल्‍हा संघातील १३,१५,१७ व १९ वर्ष वयोगटातील ६०० खेळाडू सहभागी झाले होते.

सदर स्‍पर्धेत श्री साईबाबा शैक्षणिक संकुलातील १३ वर्षे वयोगटातील अनुष्‍का वदक,आयशा जगताप,सबुरी हुरे,भक्‍ती गोंदकर,अनुष्‍का पटारे या विद्यार्थींनीनी कास्‍यपदक पटकावले.१७ वर्षे वयोगटातील श्रृती उपाध्‍ये या विद्यार्थींनीने कास्‍यपदक पटकावले.१७ वर्षे वयोगटातील (मिश्र) स्‍वाती कणके या विद्यार्थींनीने सुर्वणपदक पटकावले.१९ वर्षे वयोगटातील (मिश्र) श्रध्‍दा डांगे, साहील साळवे या विद्यार्थांनी कास्‍यपदक पटकावले.तर १९ वर्षे वयोगटातील (मुले) साहील साळवे कास्‍यपदक पटकावले आहे.

श्री साईबाबा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थांनी उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन करून या खेळाडूंनी मिळवलेल्‍या या दैदिप्‍यमान यशाबद्दल संस्‍थानचे अध्‍यक्ष आ.काळे,उपाध्‍यक्ष अॅड.जगदीश सावंत, मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत,सर्व विश्‍वस्‍त व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्‍यासह सर्व प्रशासकीय अधिकारी,सर्व प्राचार्य व शिक्षकांनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे.तसेच या विद्यार्थ्‍यांना क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र कोहकडे,सुजय बाबर,विक्रम सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close