जगावेगळा हरींनाम सप्ताह
सफल माणसाचे उपदेश जसे महत्वाचे तसे विफल माणसाचेहीं-महंत रामगिरीजी
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
प्रवचन पुष्प क्रं.३
जगात सफल झालेल्या माणसाचे उपदेश जसे महत्वाचे तसे विफल झाले त्यांचे उपदेश महत्वाचे असल्याचे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी श्री क्षेत्र कोकमठाण येथील प्रवचन सेवेचे तिसरे पुष्प गुंफताना केले आहे.
“काम,क्रोध,लोभ,मोह,मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू किंवा षडरिपू (सहा शत्रू) असे म्हणतात.या भावनांमुळे मन अशांत होते.मोह,तृष्णा हे विकार आहेत.ते सोडले तर समाधान मिळू शकते.आपण तीन सप्ताहात तीन विकारांची माहिती दिली आहे.आगामी काळात उर्वरित विकारांची माहिती दिली जाईल”-महंत रामगिरीजी महाराज,श्री क्षेत्र कोकमठाण.
देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्री सद्गुरू गंगागीरीजी महाराज यांच्या,”शतकोत्तर अमृत महोत्सवी अखंड हरींनाम सप्ताह’ कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे आज नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला आहे.त्याचा प्रत्यक्ष लाभ तिसऱ्या दिवशीही लाखो भाविकानी घेतला आहे.त्यावेळी दुपारी एक वाजता महंत रामगिरीजी महाराज यांनी आपले प्रवचनाचे तिसरे पुष्प गुंफले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी नेवासा तालुक्यातील देवगड येथील ह.भ.प.भास्करगिरीजी महाराज,पांडुरंगगिरी महाराज,सेवगिरीजी महाराज,नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती वंदना मुरकुटे,सुंदरगीरीजी महाराज,मधुकर महाराज आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सफल झालेल्या माणसाकडून इतरांना प्रेरणा मिळते.त्यापासून ते बोध घेऊन आपले यश मिळविण्यासाठी प्रमाण मानतात.तसेच अपयश मिळालेल्या माणसाकडूनही त्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नांची माहिती व त्यासाठी त्याच्याकडून कोणत्या चुका झाल्या त्या टाळण्यासाठी त्याच्याकडून माणसाला बोध होत असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.त्या साठी त्यांनी रावणाचे उदाहरण दिले आहे.सुवर्णाची लंका असलेल्या रावणाला उपदेश द्यायला त्याच्याकडे काय होते.त्याला धनात,सत्तेत सुख असल्याचे वाटत होते.त्याला सोन्याला सुगंध,खारे पाणी गोड करण्याचे,तर स्वप्न होते ते सर्व असफल राहिले तर सामान्य माणूस कोठे राहिला.
माणूस कधीच तृष्णेच्या आहारी जाऊ नये.कौरव नष्ट झाले ते तृष्णेमुळे,सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन देण्यास कौरवांनी नकार दिला.तृष्णेचे शमन करणे गरजेचे आहे त्यासाठी धैर्य आवश्यक आहे ते धर्मातून मिळते,भक्त प्रल्हादाचे उदाहरण देऊन त्याने भक्ती कधीही सोडली नाही.पापाचे क्षय करण्यासाठी परमेश्वराने दुःख दिले आहे म्हणून ते निमूट सोसावे.भजन सर्वच करतात पण समाधान तुकाराम महाराजांच्या सारखे तुम्हाला का मिळत नाही त्यांची तृष्णा संपली होती.तृष्णा तरंगती असते ती निरनिराळी असते.एक संपली दुसरी निर्माण होते,दहा संपल्या शेकडो निर्माण होतात.यासाठी त्यांनी संत तुलसीदासांचे उदाहरण दिले आहे.राग म्हणजे आसक्ती,त्यामुळेच तर दुःख आहे.धृष्टराष्ट्र पुत्र स्नेहामुळे आसक्तीमुळे वाहवत गेला होता.या स्नेहामुळे धृष्टराष्ट्र निर्णय घेऊ शकला नाही व शूद्र मोहाच्या आहारी गेला व स्वतःचा आणि पुत्र नाशाला कारणीभूत झाला.अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी भंगवंताला त्याला उपदेश करावा लागला उपदेशामुळे तो मोह नष्ट झाला तशी कबुलीच अर्जुनाने गीतेत दिली आहे.
काम,क्रोध,लोभ,मोह,मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू किंवा षडरिपू (सहा शत्रू) असे म्हणतात.या भावनांमुळे मन अशांत होते.मोह,तृष्णा हे विकार आहेत.ते सोडले तर समाधान मिळू शकते.आपण तीन सप्ताहात तीन विकारांची माहिती दिली आहे.आगामी काळात उर्वरित विकारांची माहिती दिली जाईल.
गेले तीन वर्षे आपण विविध सप्ताहात याच विषयावर प्रवचन केले आहे तरी चिंतन संपले नाही यापूर्वीच्या तीन सप्ताहात तीन विकारांवर आपण बोललो आहे.अद्याप तीन बाकी आहे.आता तर १७५ वा सप्ताह संपन्न होत आहे.गत दोन सप्ताहात या विविध श्लोकावर चिंतन करत आहोत.धृतीवर आपण या सप्ताहात बोलत आहोत.हा सप्ताह निष्पहृ आहे.निष्काम भावनेने हे सर्व भजनी भजन करत आहेत.परमेश्वराचे चिंतन एकांतात करावे संत तुकारांमानी केले सामान्य माणसाने या मोहतून बाहेर पडले तर त्यालाही आत्मशांती नक्कीच लाभेल असे आवाहन त्यांनी उपस्थित श्रोतुवर्गाला केले आहे.
या प्रवचन सेवेचे सूत्र संचलन पिंगळे मॅडम यांनी केले आहे.यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.या प्रवचन सेवेनंतर उपस्थित भाविकांनी भाकरी आमटी प्रसादाचा लाभ घेतला.दुपारी पावसामुळे काही काळ व्यत्यय निर्माण झाला होता.