जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ऊस विकण्याच्या कारणावरून हाणामारी,तीन गंभीर जखमी,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादी महिलेसह अन्य दोघांना ऊस विकण्याच्या कारणावरून वाद होऊन त्यांना आरोपी भाऊसाहेब संपत जाधव व अन्य दोघांनी गंभीर मारहाण करून जखमी केले असल्याची फिर्याद श्रीमती रेखा विठ्ठल साठे (वय-५०) या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे सांगवी भुसार व परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी भाऊसाहेब जाधव याने फिर्यादिस,”तू,माझी गावात बदनामी करुन,तू गावात मी ऊस विकला आहे असे लोकांना का सांगते ? असे म्हणून फिर्यादी व तिचे मुलगा यांना कानाखाली मारली तेंव्हा त्याचे वडील त्यांना सोडविण्यास गेले असता वडिलांचे दोन्ही हातावर मारून त्यांचा उजवा हातास टिचवले आहे.व गंभीर जखमी केले आहे.या प्रकरणी कोपरगावात गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला रेखा साठे रा.चैतन्य सोसायटी,दादा पाटीलवाडी स्टेशन जवळ नोपाडा ठाणे ह.मु.सांगवी भुसार येथील रहिवासी आहे.त्याचा आरोपी भाऊसाहेब संपत जाधव,जयेश भाऊसाहेब जाधव,आदित्य भाऊसाहेब जाधव यांचेशी वाद आहेत.

सोमवार दि.१ ऑगष्ट रोजी फिर्यादी महिला व तिचा पती आणि मुलगा बसलेले होते.सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आरोपी भाऊसाहेब जाधव याने फिर्यादिस,”तू,माझी गावात बदनामी करुन,तू गावात मी ऊस विकला आहे असे लोकांना का सांगते ? असे म्हणून फिर्यादी व तिचे मुलगा यांना कानाखाली मारली तेंव्हा त्याचे वडील त्यांना सोडविण्यास गेले असता वडिलांचे दोन्ही हातावर मारून त्यांचा उजवा हातास टिचवले आहे.व गंभीर जखमी केले आहे.व फिर्यादी व त्याचे अन्य नातेवाईक यांना,” तुम्ही सांगवी भुसार येथे यायचे नाही व शेती करायची नाही,”तुम्ही ऐकले नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी आरोपीनी दिली आहे.

या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पो.हे.कॉ.बोटे यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीसांनी आपल्या दप्तरी नोंद क्रं.३०५/२०२२ भा.द.वि.कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.डी.बोटे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close