शैक्षणिक
कोपरगावातील…या महाविद्यालयांत राष्ट्रीय वेबिनार संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयांत आय.क्यु.ए.सी.व इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अवेअरनेस’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनार ऑनलाईन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
संकल्पित छायाचित्र.
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शोधदृष्टी समृद्ध व्हावी तसेच त्यांच्या संशोधनास चालना व संरक्षण मिळण्यासाठी आय.पी.आर.विषयीचे ज्ञान असणे महत्वाचे आहे,या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व संशोधकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीने हे चर्चासत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे”-प्राचार्य-डॉ.रमेश सानप,श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालय कोपरगाव.
सदर चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पेटंट ऑफिस,मुंबई येथील पेटंट परीक्षक कु.जसप्रीत कौर ह्या उपस्थित होत्या.आपल्या भाषणातून त्यांनी आय.पी.आर.विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच पेटंट विषयीचे विविध नियम,पेटंट संदर्भात घ्यावयाची काळजी आदी बाबींविषयी विस्तृत विवेचन केले.चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप होते.
सदर प्रसंगी चर्चासत्रासाठी महाराष्ट्र,राजस्थान,गुजरात येथून विविध प्राध्यापक,संशोधक व विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.
सदर प्रसंगी प्राचार्य डॉ.सानप म्हणाले की,”ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शोधदृष्टी समृद्ध व्हावी तसेच त्यांच्या संशोधनास चालना व संरक्षण मिळण्यासाठी आय.पी.आर.विषयीचे ज्ञान असणे महत्वाचे आहे,या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व संशोधकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीने हे चर्चासत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे.
चर्चासत्राचे प्रास्ताविक इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा.घनश्याम भगत यांनी केले.सूत्रसंचलन प्रा. दिपेश मोरे यांनी केले तर प्रा.कु.सोनल लोहाटे यांनी आभार मानले.