शैक्षणिक
श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलचा यंदा शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून तो १०० टक्के लागला आहे. शाळेतून दहावीच्या परीक्षेला बसलेले सर्व २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातून ८० टक्के च्या वर १९ विद्यार्थी गुण घेऊन उत्तीर्ण झाल तर ४ विद्यार्थी ७५ टक्के च्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विशाल सीताराम पवार व अनुष्का विजय घाटे यांनी प्रत्येकी ९० टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे तर कु.साक्षी बाबासाहेब शिंदे ८९ टक्के गुण मिळवून दुसरी आली आहे.तर शुभम राजेंद्र खटकाळे याने ८८ टक्के गुण मिळवून शाळेत तिसरा आला आहे. या यशाबद्दल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष केशवराव भवर आदींनी प्राचार्य,शिक्षक आणि उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.