जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात सिमेंट पोलवरून हाणामारी,तीन जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेले फिर्यादी यांचे शेताचे बांधावरील सिमेंटचे पोल तोडल्याच्या कारणावरून आरोपी संदीप शिवाजी वाळुंज यांचेसह पाच जणांनी आपल्याला गैर कायद्याची मंडळी जमवून लोखंडी पाईप व लाकडी दांडा आदींच्या साहाय्याने आपल्याला मारहाण केली असून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा फिर्यादी राजेंद्र रामराव कांडेकर (वय-४२) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कान्हेगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

दि.१७ जून रोजी सकाळी ०८ वाजेच्या सुमारास आरोपी संदीप वाळुंज व त्यांच्या अन्य साथीदारांनी आपल्या बांधावरील सिमेंटचे पोल परस्पर काढून टाकले व फिर्यादीचे नुकसान केले आहे.याचा आपण त्यांना जाब विचारला असता आरोपी संदीप वाळुंज यांचेसह पाच जणांनी आपल्याला गैर कायद्याची मंडळी जमवून लोखंडी पाईप व लाकडी दांडा आदींच्या साहाय्याने आपल्याला मारहाण केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी राजेंद्र कांडेकर व आरोपी संदीप वाळुंज हे एकाच गावातील रहिवासी असून त्यांचा शेताचा (गट क्रं.१३२/२) बांध शेजारी-शेजारी आहे.त्यांच्या बांधावर सिमेंटचे पोल रोवलेले होते.ते दि.१७ जून रोजी सकाळी ०८ वाजेच्या सुमारास आरोपी संदीप वाळुंज व त्यांच्या अन्य साथीदारांनी आपल्या बांधावरील सिमेंटचे पोल परस्पर काढून टाकले व फिर्यादीचे नुकसान केले आहे.याचा आपण त्यांना जाब विचारला असता आरोपी संदीप वाळुंज व दीपक शिवाजी वाळुंज,अनिल अशोक वाळुंज,सुनील अशोक वाळुंज,अशोक गजाहरी वाळुंज आदींनी आपल्याला गैर कायद्याची मंडळी जमवून लोखंडी पाईप व लाकडी दांडा आदींच्या सहाय्याने आपल्याला मारहाण केली असून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा फिर्यादी राजेंद्र रामराव कांडेकर (वय-४२) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला असून घटनास्थळी पोलीस हे.कॉ.आर.एम.म्हस्के यांनी भेट दिली आहे.

दरम्यान या घटनेत फिर्यादी स्वतः व स्वाती राजेंद्र कांडेकर (वय-३८),विराज राजेन्द्र कांडेकर (वय-१७)आदी तीन जण जखमी झाले आहे.त्याच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२२५/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६,४२७ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close