कोपरगाव तालुका
विकासाचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव वैजापुर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या तळेगाव मळेसह मतदार संघातील विकासाचे बहुतांश प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून यापुढील काळातही विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारअसल्याची ग्वाही श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
“तळेगाव मळेचे ग्रामपंचायतीची सत्ता आल्यापासून गावातील रस्ते ग्रामपंचायत कार्यालय असे विविध विकास कामे पूर्ण झाली आहे तळेगाव मळे जरी कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या शेवटच्या टोकाला असले तरी मागील अडीच वर्षात वर्षात मतदार संघाच्या पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत विकासासाठी निधी देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष, साईबाबा संस्थान शिर्डी.
कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत ८१.०९ लक्ष रुपये निधीतून मंजूर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आ.काळे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,सरपंच सचिन क्षीरसागर,दत्तात्रय देवकर,दशरथ वरकड,अनिल वाकचौरे,गोरख भवर,आबासाहेब डुकरे,जनार्दन टुपके,तुकाराम क्षीरसागर,दत्तात्रय टुपके,जनार्दन भवर,साहेबराव आभाळे,तुकाराम टुपके,गोरक्षनाथ क्षीरसागर,रघुनाथ टुपके,मंजाहरी टुपके,ऋषीकेश वाकचौरे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,अभियंता उत्तम पवार,विस्तार अधिकारी डी.ओ.रानमाळ,ग्रामसेविका सुवर्णा वडीतके,अंगणवाडी सेविका सुजाता निकम,कॉन्ट्रॅक्टर हौशीराम सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”तळेगाव मळेचे ग्रामपंचायतीची सत्ता आल्यापासून गावातील रस्ते ग्रामपंचायत कार्यालय असे विविध विकास कामे पूर्ण झाली आहे तळेगाव मळे जरी कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या शेवटच्या टोकाला असले तरी मागील अडीच वर्षात वर्षात मतदार संघाच्या पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत विकासासाठी निधी देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.तळेगाव मळेच्या स्मशानभूमीत प्रश्न प्रलंबित आहे.ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या जागेवर स्मशानभूमीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही त्यांनी दिली.अनेक वर्षानंतर कोपरगाव तालुक्यात ह.भ.प.सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह कोकमठाण येथे होत आहे.
या सप्ताहासाठी आपल्या गावाला सेवा दिली जाणार आहे. या सेवेतून परमार्थ करण्याची मोठी संधी मिळणार आहे. त्याचा समस्त ग्रामस्थांनी लाभ घेऊन सप्ताहासाठी दिलेली सेवा पूर्ण करावी असे आवाहन ना. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.