गुन्हे विषयक
कोयत्याने मारहाण,दोन जखमी,तिघांवर कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील रहिवासी असलेला फिर्यादीचा आरोपी भाचा विजय अनिल चव्हाण हा आपल्या पत्नीला तिचे घरी घेऊन घेण्यासाठी आला असता आरोपी पांडुरंग भारम भोसले,धीरज भारम भोसले,शाम बडोद भोसले आदींनी नुकताच लताबाई भोसले हिचे घरासमोर फिर्यादी दीपक भोसले व त्याचा भाचा विजय चव्हाण या दोघांना लोखंडी टॉमी व कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.त्यामुळे पढेगावसह तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
फिर्यादी दीपक भोसले हा कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील रहिवासी असून त्याचा भाचा विजय चव्हाण हा त्याची पत्नी आपल्या माहेरी आलेली होती.तिला नेण्यासाठी शुक्रवार दि.२७ मे रोजी सायंकाळी ०८ वाजेच्या सुमारास आला होता.त्याचा आरोपी पांडुरंग भारम भोसले,धीरज भारम भोसले,शाम बडोद भोसले यांना राग आला होता.त्यांनी या कारणावरून हि हाणामारी झाली आहे.
सदरचे सविस्तर्व वृत्त असे की,फिर्यादी दीपक भोसले हा कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील रहिवासी असून त्याचा भाचा विजय चव्हाण हा त्याची पत्नी आपल्या माहेरी आलेली होती.तिला नेण्यासाठी शुक्रवार दि.२७ मे रोजी सायंकाळी ०८ वाजेच्या सुमारास आला होता.त्याचा आरोपी
पांडुरंग भारम भोसले,धीरज भारम भोसले,शाम बडोद भोसले यांना राग आला होता.त्यांनी या कारणावरून त्यास लताबाई भोसले हिचे घरासमोर त्यास लोखंडी टॉमी व कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान फिर्यादी दीपक भारम भोसले हा हे भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यास आरोपीनी संगनमत करून लोखंडी टॉमी व कोयत्याने डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे.व त्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.या वरून फिर्यादी दीपक भारम भोसले याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आदींनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१८८/२०२२ भा.द.वि.कलम ३०७,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नीं.आव्हाड हे करीत आहेत.