विशेष लेखमाला
येवला तालुक्यातील चाळीस गावांना दारणाची पाणी मंजूरीं कशी ?- शिंदेंचा सवाल

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
दारणा धरणाच्या लाभक्षेत्राबाहेरील येवला तालुक्यातील राजापूरसह चाळीस गावांना राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने दारणा धरणातून दि.०७ मार्च २०२२ रोजी (शासन निर्णय क्रं.बी.सिं.आ.२०२२/३५/२०२२/सिं.व्य.(धो.-२) २.६८ द.ल.घ.मी.नांदूर मधमेश्वर उंचावनी बंधाऱ्यातून पाणी मंजूर कसे केले ? व त्याला येथील प्रस्थापित भाजप नेत्यांनी विरोध का केला नाही ? असा गंभीर सवाल शिवसेना तारोडीचे संपर्क नेते प्रवीण शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून नुकताच विचारला आहे.
“जलसंपदा विभागाने येवला तालुक्यातील राजापूरसह चाळीस गावांना पाणी मंजूर केले आहे.आता पाणी शिल्लक कसे आहे.व येवला तालुक्यातील गावांना पाणी पालखेड धरणात असताना त्यांनी हे पाणी कसे मिळवले यावर कोणीही प्रस्थापित नेते बोलायला तयार नाही या मागील कारण काय ? त्यांना पश्चिमेकडे वाहून जाणारे मात्र मांजरपाडा वळण बंधाऱ्यातून पूर्वेकडे वळविण्यात येणारे अतिरिक्त पाणी मिळणार आहे हे माहिती नाही का ?-प्रवीण शिंदे,संपर्क नेते,शिवसेना,कोपरगाव तालुका.
कोपरगाव शहराला निळवंडे धरणातून बंदिस्त जलवाहिणीतून व शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या झोळीतून मोफत पाणी देण्याचे गाजर दाखवून जनतेला फसविण्यात येथील भाजपचे नेते आघाडीवर होते.त्यावेळी दारणा धरणात पाणी शिल्लक नाही असा जावईशोध लावून जनतेला फसविण्यात हे नेते समाधान मानत होते.त्यावेळी निळवंडे धरणातून शिर्डी व कोपरगाव शहराला पाणी दिले तर दारणा धरणातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दोन आवर्तने वाढीव असे सांगून हे नेते ‘पूतना मावशी’चे प्रेम कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दाखवीत होते. कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना व शहरातील नागरिकांना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेड्यात काढीत होते.त्याच वेळी निळवंडे कालवा कृती समितीने मात्र दारणा धरणात पाणी शिल्लक आहे हे वारंवार सप्रमाण सांगितले होते.त्यासाठी कागदपत्र जाहीर केले होते.मात्र त्यावेळी कृती समितीला खोटे ठरवायला हे नेते आघाडीवर वर होते.मात्र आज वास्तव समोर आले असून दारणाचे पाणी नांदूर मधमेश्वर उंचावनी बंधाऱ्यातून लाभक्षेत्राच्या बाहेर गेले आहे.आता या नेत्याना कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाणी कमी होताना दिसत नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हीच ती येवला तालुक्यातील राजापूर सह चाळीस गावांची पाणी मंजुरी त्यावर कोपरगावतील नेते चकार शब्द बोलत नाही.
एक दशकभर हीच मंडळी मुकणे धरणाचे पाणी कोपरगाव तालुक्याला मिळणार आहे असे सांगत होती.मुकणेचे पाणी यांच्या नाकाखालून जलद कालव्यातून मराठवाड्यातील वैजापूर व गंगापूरला तालुक्यांना दिले गेले होते.आता त्यावर हि मंडळी चकार शब्द बोलत नाही.असेच वर्षानुवर्षे शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे.निवडणुका आल्या की नवीन मामला समोर घेऊन हि मंडळी जनतेसमोर येते निवडणुकीच्या मतपेट्या बंद झाल्या की पुन्हा पाच वर्ष गायब होतात हे वर्षानुवर्षे सुरु आहे.यावर प्रवीण शिंदे यांनी प्रकाशझोत टाकला आहे.
दरम्यान नुकताच जलसंपदा विभागाने येवला तालुक्यातील राजापूरसह चाळीस गावांना पाणी मंजूर केले आहे.आता पाणी शिल्लक कसे आहे.व येवला तालुक्यातील गावांना पाणी पालखेड धरणात असताना त्यांनी हे पाणी कसे मिळवले यावर कोणीही प्रस्थापित नेते बोलायला तयार नाही या मागील कारण काय ? त्यांना पश्चिमेकडे वाहून जाणारे मात्र मांजरपाडा वळण बंधाऱ्यातून पूर्वेकडे वळविण्यात येणारे अतिरिक्त पाणी मिळणार आहे हे माहिती नाही का ? त्या बाबत येवला तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते वर्तमान पत्रात मोठं-मोठ्या जाहिराती देऊन आपली पाठ थोपटून घेताना दिसत आहे.मात्र कोपरगावच्या काळे- कोल्हे या नेत्यांनी सोयीस्कर डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे.त्याबाबत हे नेते का तोंड उघडत नाही ? असा कडवा सवाल संपर्क नेते प्रवीण शिंदे यांनी शेवटी विचारला आहे.