जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
मनोरंजन

“घाबरायचे नाही,लढायचे” रेखाटनाचे कौतुक

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

“कोरोना” हा विषाणू सर्व प्रथम १९६० च्या दशकात सापडला. सर्वात आधी सापडलेल्यांमध्ये कोंबड्यांमध्ये एक संसर्गजन्य ब्रॉन्कायटीस विषाणू आणि सामान्य सर्दी असलेल्या दोन रुग्णांमध्ये (नंतर ह्यूमन कोरोनाव्हायरस २२ ई आणि ह्यूमन कोरोनाव्हायरस ओसी (४२)असे नाव देण्यात आले) होते. २००३ मध्ये सार्स-सी.ओ.व्ही., एचसीओव्ही एन.एल. २००४ मध्ये एच.के.यू. १, २०१२ मध्ये मेर्स-सीओव्ही आणि २०१९ मध्ये एस.ए.आर.एस.-कोव्ही -२ (पूर्वी २०१९-एन.सी.ओ.व्ही. म्हणून ओळखले जाणारे) या कुटुंबातील अन्य सदस्यांची ओळख पटली आहे. यामध्ये गंभीर श्वसनमार्गाचे संक्रमण होते.त्याचा प्रादुर्भाव नेमका कोठून होतो व त्याला नामशेष करण्याचा उपाय अद्याप शास्त्रज्ञांना सापडला नाही.त्यामुळे नागरिकांत त्या बाबत भीतीचे वातावरण आहे.त्यासाठी जनगजागृती हा सर्वात चांगला व प्रभावी उपाय मानला जातो.त्यामुळे या डॉ.सी.एम.मेहता या शाळांसारखे उपाय अन्य शाळांही अवलंबणे गरजेचे बनले आहे.

त्या बाबत कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. सी एम मेहता कन्या विद्यालयाचे कलाशिक्षक प्रा. अमोल निर्मळ हे कौतुकाला पात्र आहे.त्यांनी त्याचे रेखाटन करून कोरोना व्हायरस “घाबरायचे नाही…. लढायचे” या विषयावर जनजागृती केली आहे. निर्मळ यांनी शाळेच्या फलकावर कोरोना व्हायरस व त्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबतही ही जागृती केली आहे .निर्मळ यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close