आरोग्य
कोपरगावात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी सुरु
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2020/03/images-2020-03-16T184349.936-1-684x405.jpeg)
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यासह देशभरात “कोरोना” विषाणूंचा प्रादुर्भाव चर्चेत आला असताना त्यावर उपाययोजना सुरु करण्यासाठी कोपरगाव तालुका प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशांप्रमाणे उपाय योजना सुरु केल्या असून कोपरगाव तालुक्यातील मंगल कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक नूकतीच आयोजित करण्यात आली होती त्या वेळी त्यानां या विषाणू बाबत सजग करून प्रतिबंधात्मक उपायांचे मार्गदर्शन कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
भारतात सध्या कोरोनाग्रस्त असेलेली १०७ प्रकरणं समोर आली आहेत. दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण जगातील १२० देशांमध्ये ज्या तीव्रतेने कोरोना व्हायरस पसरला आहे, त्या तुलनेत भारतातील रुग्णांची संख्या कमी आहे. याला नेमकं काय कारण आहे ? या बाबत उलटसुलट चर्चा सुरु असली तरी या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधानता हाच प्रभावी बचाव असू शकतो.
भारतात सध्या कोरोनाग्रस्त असेलेली १०७ प्रकरणं समोर आली आहेत. दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण जगातील १२० देशांमध्ये ज्या तीव्रतेने कोरोना व्हायरस पसरला आहे, त्या तुलनेत भारतातील रुग्णांची संख्या कमी आहे. याला नेमकं काय कारण आहे ? या बाबत उलटसुलट चर्चा सुरु असली तरी या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधानता हाच प्रभावी बचाव असू शकतो.त्या मुळे तज्ञ्जांच्या मते, कोरोना व्हायरस चाचणीला भारतात अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. १२५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात अशा पद्धतीने कोरोना व्हायरसचे स्क्रिनिंग आणि नमुने तपासले जाणं हे पुरेसं नाही. कधी परदेशात न गेलेल्या तसंच कधी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते.या पार्श्वभूमीवर त्याच्या उपाययोजना करणे महत्वपूर्ण ठरत असून या पार्श्वभूमीवर या बैठकीचे महत्व वाढले आहे.
लग्न कार्य,वाढदिवस,कुंकू,सुपारी,जागरण, गोंधळ आदींचा वर्तमानात हंगाम आहे त्यामुळे प्रशासनावर जबाबदारी वाढत आहे.या समारंभ प्रसंगी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होवू न देणे.कार्यालयाची स्वच्छता, आलेल्या लोकांसाठी साबणासह हात धुण्याची व्यवस्था ठेवणे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती फलक प्रदर्शित करणे.यासह कोरोना संसर्ग प्रतिबंध करणेकामी जिल्हाधिकारी,अहमदनगर यांनी घालून दिलेले निर्बंध आणि नियम याचे काटेकोर पालन करणेकामी कार्यालय मालकांना लेखी पत्र देवून आवश्यक त्या सर्व सुचना दिल्या आहे. याप्रसंगी निवासी नायब तहसिलदार योगेश कोतवाल, तुरुंग अधिकारी रविंद्र देशमुख यांचेसह कोपरगांव तालुक्यातील मंगल कार्यालय मालक उपस्थित होते.