गुन्हे विषयक
शेतात कामाला येऊ दिले नाही म्हणून मारहाण,कोपरगावात तिघांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण बावीस कि. मी.अंतरावर असलेल्या हंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला आरोपी दत्तू रामनाथ चव्हाण,नवनाथ तुकाराम चव्हाण,वनिता नवनाथ चव्हाण आदींनी आपल्याला त्यांना कामावर येऊ दिले नाही याचा राग मनात धरून आपल्याला बांबूच्या सहाय्याने मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा त्याच गावातील फिर्यादी किसन यादव चव्हाण (वय-३५) याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे हंडेवाडी परिसरासह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आपला सहकारी मजूर हा दारू पिलेला असल्याने आपण त्यास म्हणालो की,”आज तू दारू पिलेला असल्याने आमचे सोबत शेतीचे कामावर येऊ नको” याचा राग मनात धरून आरोपी दत्तू चव्हाण हा त्याच दिवशी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास भेटला व म्हणाला की,”आज तू मला तुझ्या सोबत कामाला का येऊ दिले नाही”असे म्हणून घाणघाण शिवीगाळ करू लागला होता.त्याच वेळी त्याने त्याच्या हातातील बांबू माझ्या डोक्यात मारला त्यामुळे फिर्यादीच्या डोक्याचे रक्त निघाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी किसन चव्हाण हे वरील गावी आपल्या पत्नी,अनिता चव्हाण,तीन मुली,एक मुलगा,आई,वडील असे एकत्र राहतो.व आपली शेती करतो.उर्वरित वेळेत आपण वेळ मिळाल्यावर अन्य शेतीत मिळेल ते काम मजुरीने करतो.वर्तमानात आपण त्याच गावातील शेतकरी भाऊसाहेब नरवडे यांच्या डाळिंबाची छाटणी करण्यासाठी जातो.माझे सोबत गावातील दत्तू चव्हाण व नंदू माळी असे सहकारी असतात.दि.१७ फेब्रुवारी रोजी दत्तू चव्हाण हा दारू पिलेला असल्याने आपण त्यास म्हणालो की,”आज तू दारू पिलेला असल्याने आमचे सोबत शेतीचे कामावर येऊ नको” याचा राग मनात धरून आरोपी दत्तू चव्हाण हा त्याच दिवशी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास मला नवनाथ चव्हाण यांचे घरासमोर भेटला व म्हणाला की,”आज तू मला तुझ्या सोबत कामाला का येऊ दिले नाही”असे म्हणून घाणघाण शिवीगाळ करू लागला होता.त्याच वेळी त्याने त्याच्या हातातील बांबू माझ्या डोक्यात मारला त्यामुळे फिर्यादीच्या डोक्याचे रक्त निघाले होते.त्या वेळी त्याने माझेसह माझी पत्नी वनिता हिला पण शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊ लागला होता.
दरम्यान माझा भाऊ बंडू चव्हाण याने मला कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात घेऊन आला व त्या ठिकाणी उपचाराचा सल्ला देण्यात आला.त्या नंतर आपण कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेलो.व तेथे उपचार झाल्यानंतर आरोपी आरोपी दत्तू रामनाथ चव्हाण,नवनाथ तुकाराम चव्हाण,वनिता नवनाथ चव्हाण आदींनी मला बांबूने मारहाण करून जखमी केले आहे.अशी फिर्याद दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव याचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजू चव्हाण हे करीत आहेत.