जाहिरात-9423439946
सहकार

कोपरगाव तालुक्यातील…या वि.का.स.संस्थेची निवडणूक बिनविरोध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यात विविध कार्यकारी सहकारी संस्थांत अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या धामोरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व इफकोचे माजी संचालक चंद्रशेखर कुलकर्णी यांचे नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली आहे.नूतन संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान या धामोरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने सातत्याने चाळीस वर्ष सभासदांना १० टक्के लाभांश देणारी संस्था असून सर्व सभासदांचे २० हजारांचे भाग भांडवल पूर्ण झालेले आहे.या संस्थेचे नेतृत्व संस्थापक स्व.पंडितराव कुलकर्णी यांनी स्थापनेपासून २५ वर्ष तर चंद्रशेखर कुलकर्णी यांनी १९८३ ते २०२३ असे ४० वर्ष नेतृत्व केले आहे हे विशेष !

स्व.पंडीतराव कुलकर्णी यांनी १९५० साली स्थापन केलेल्या या संस्थेने सुमारे ४० वर्षांपासून बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम राखली आहे.संस्थेमार्फत दरवर्षी सभासदांना लाभांश वाटप केला जात असुन कायम सभासदांचे हित जोपासण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.

नवनिर्वाचित संचालक सर्व साधारण कर्जदार प्रतिनिधी चंद्रशेखर कुलकर्णी,चैतन्य कुलकर्णी,अरुण भाकरे,सुनिल दरेकर,कैलास बारे,राजेंद्र वाघ,माणिक सोमासे,भाऊसाहेब माळी आदींचा समावेश आहे.

तर इतर मागास प्रतिनिधी प्रा.संदिप जगझाप,महिला राखीव सोनुबाई माळी,विमल खिलारी,भटक्या विमुक्त जाती मधुन बापुराव कोळपे,अनुसूचित जाती प्रतिनिधी बाळासाहेब आहिरे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

दरम्यान या निवडणूकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,कोपरगांव कार्यालयाचे सहकार अधिकारी कृष्णा वाळके यांनी काम पाहिले आहे.तर त्यांना सचिव मनोज कुलकर्णी यांनी सहकार्य केले आहे.

दरम्यान सदर निवडणुक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगांव तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,गौतम बँकेचे संचालक पुंडलिक दादा माळी,बाबुराव दरेकर,भास्करराव वाघ,रामराव माळी,नारायण बारे,देवराम माळी,संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब खिलारी,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक मनोज जगझाप,पंडितराव कुलकर्णी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वाईकर,उपाध्यक्ष सुनिल जगझाप,दौलतराव वाघ,बबनराव वाघ,प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या बहुतेकांचे सहकार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close