कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील गावठाण वाढीचे प्रस्ताव मंजूर करा-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर,कोकम ठाण,कान्हेगाव,वारी सह अनेक ग्रामपंचायतचे गावठाणसाठी जागा मागणीचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत ते त्वरित मंजूर करावेत अशी मागणी कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हटवले असून या पार्श्वभुमीवर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ हादरले असून अनेकांनी बैठका घेऊन या बाबत न्यायिक दबाव निर्माण करून शासकीय व न्यायिक दरबारी असलेले खटले मागे घेण्यासाठी तक्रारदारांवर दबाव निर्माण केले आहे.तर अनेकांनी ग्रामसभा घेऊन दबाव वाढवला आहे.यावर उलटसुलट चर्चा झडत आहे.या पार्श्वभूमीवर मागणीला अर्थ प्राप्त झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील वरील नमूद केलेल्या गावाच्या ग्रामपंचायतीने त्यांच्या परिसरातील शेती महामंडळाच्या मालकीच्या जागेची मागणी गावठाण साठी केलेली असून असे प्रस्ताव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने महसूल विभागाकडे वाडीव गावठाण मागणीचे प्रस्ताव सादर केले आहे.या प्रश्नाकडे माननीय नामदार साहेब यांनी व्यक्तिशः लक्ष घालून ते प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत अशी मागणी कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे, गावामध्ये हजारो लोकांना घरकुले मंजूर झालेली आहेत मात्र त्या नागरिकांना स्वतः ची जागा नाही व ग्रामपंचायत ला गावठाण साठी जागा नाहीत, त्यामुळे संबंधित गोर गरीब लाभार्थी घरकुल योजने पासून वंचित राहत आहेत.तरी मंत्री थोरात यांनी या कामी लक्ष घालून संबंधित गावठाण साठी चे जागा मागणीचे प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत अशी मागणी आज कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.निवेदनावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,शिवसेनेचे तालुका सचिव अशोक कानडे,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख किरण खर्डे आदींच्या सह्या आहेत.