शैक्षणिक
पालकांनी मुलांचे गुण हेरून प्रोत्साहन द्यावे-सौदागर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पालकांनी आपल्या इच्छा आपेक्षा आपल्या मुला-मुलींवर लादू नये त्यामुळे त्याच्यामध्ये नैराश्य येते.पालकांनी त्यामधील सुप्त गुण ओळखून त्याप्रमाणे मुलाना प्रोत्साहन दिले तर ध्येय निश्चितच गाठून पूर्ण करू शकतात असे प्रतिपादन पटकथा लेखक बाबासाहेब सौदागर यांनी कोपरगाव नजीक विद्यालयातील एका कार्यक्रम प्रसंगी केले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेनात के.जी.पासून ते १२ वी पर्यंत चे विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार नाटय छटा,संस्कृत भाषेतील नाटीका सादर केल्या त्यास उपस्थित मान्यवरांची व पालकांची दाद मिळवली आहे.
कोपरगाव नजीक असलेल्या कोपरगाव बेट येथे संत जनार्दन स्वामी महर्षी स्कूलच्या रौप्य मोहोत्सवी वर्षा निमित्त २५ व्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या प्रसंगी ते बोलत होत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर हे होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थीती संत जनार्दन स्वामी ट्रस्टचे विश्वस्त रमेशगिरी महाराज,संस्थेचे उपाध्यक्ष विलास कोते,सचिव अंबादास अत्रे,विश्वस्त अॅड. अनिल जाधव,बाळासाहेब चव्हाण,आशुतोष पानगव्हाणे,अतुल शिंदे,शिवनाथ शिंदे,तात्यासाहेब गोंडे तसेच विद्यालयाचे प्राचार्य पानसरे,प्रशासकीय अधिकारी डॉ.श्रीरंग झावरे,व्यवस्थापक विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा या विद्यालयात प्रवेश घेतला ते खरोखरच भाग्यवान आहेत.राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या कृपादृष्टीने व रमेशगिरी महाराजांच्या आर्शिवादाने विद्यार्थी निश्चिंतच आपले उज्वल भविष्य घडवतील.स्व.मोहनराव चव्हाण यांच्याकडे समाजाच्या अंतरंग ओळखण्याची दुरदृष्टी होती.त्यामुळे त्यानीं सी.बी.एस.ई.माध्यमाची शाळा पंचक्रोशित सुरू केली.त्याचा ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.
सदर प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेतील व परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी रमेशगिरी महाराज,व संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर यानीं उपस्थित विद्यार्थी व पालकांना शाळेच्या चोविस वर्षाचा जडण-घडनीचा प्रवास आणि शाळेतील गुणवंता वाढीबद्दल सर्व विश्वस्त मंडळ,प्राचार्य व सर्व शिक्षक प्रयत्नशिल असल्याचे ते शेवटी म्हणाले आहे.
वार्षिक स्नेहसंमेलन च्या यशस्वीतेसाठी सर्व श्री जयप्रकाश पायंडे,विजय कोल्हे,किशोर भोसले,महेश शिंदे, इम्रान शेख,विद्या ठाकूर,गायत्री पटेल,सारिका सोनवणे,अनिता वरकड,प्रणिता डोमाडे,वैशाली डागा यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पानसरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन अनिल भागवत,संजय दिवटे,सुरज तुवर,मेघराज काकडे,वनिता औताडे,सारिका सोनवणे,शादमीन सय्यद यांनी केले तर आभार संतोष चव्हाण यांनी मानले आहे.