कोपरगाव तालुका
लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर यांना मातृशोक
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहारातील प्रसिद्ध लेखापरीक्षक दत्तात्रय बाळाजी खेमनर यांच्या मातोश्री शेवंताबाई बाळाजी खेमनर (वय-८४) यांचे नुकतेच आपल्या राहत्या घरी निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर वेस ग्रामपंचायत हद्दीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.शेवंताबाई खेमनर या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून वेस-सोयगाव परिसरात प्रसिद्ध होत्या.त्यांच्या पतीचे निधन नोव्हेंबर २०१७ रोजी झाले होते.त्यांचा निधनानंतर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती.त्यांनी आपल्या मुलांचे शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही केले.त्यांचे जेष्ठ चिरंजीव दत्तात्रय खेमनर यांनी वाणिज्य विभागातील सर्वोच्च पदवी लेखा परिक्षक (सी.ए.) पदवी मिळवून त्यांच्या कष्टाचे चीज केले होते.वेस-सोयगाव हा अत्यंत दुष्काळी भाग म्हणून परिचित आहे.त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या गावीच राहणे पसंत केले.त्यांच्यावर वेस येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी वेस व परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.